पुणे, 20 डिसेंबर 2021
पॅनएक्स -21 (PANEX-21) हा एक बहु- राष्ट्रीय-बहु -संस्थांचा सहभाग असलेला सराव 20 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आला असून बिमस्टेक राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन बाबींमध्ये सामायिक क्षमता विकसित करणे हा याचा उद्देश आहे. या सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड मधील प्रतिनिधी आणि विषय तज्ञ उपस्थित आहेत.

