मेक्सिन सिटी, मेक्सिको, १३ सप्टेंबर २०२२ – युपीएल या शाश्वत शेतीसाठी लागणारी उत्पादने व सेवा पुरवणाऱ्या जागतिक पुरवठादार कंपनीने मेक्सिकोमधील भारतीय दुतावासाच्या सहकार्याने सन्माननीय चेंबर ऑफ ड्युटीजशी करार केला असून या कराराअंतर्गत मेक्सिकोच्या संसद भवनाच्या आवारातील उद्यानाचे सौंदर्यीकरण व देखभाल केले जाणार आहे.
तीन घटकांमधील बांधिलकीचे प्रतीक असलेल्या मैत्री उद्यानाच्या आज झालेल्या उद्घाटनासह शाश्वतता आणि हरित जागांच्या प्रसाराला चालना दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवरांनी लावलेल्या उपस्थितीने आम्ही भारावून गेलो असून लोकसभेचे अध्यक्ष (लोकसभा), भारतीय संसद, मेक्सिकोच्या चेंबर ऑफ डेप्युटीज समान, ए. ई. श्री. ओम बिर्ला जे मेक्सिकोच्या अधिकृत भेटीवर असलेल्या भारतीय संसद प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी आणि डिप. सर्जियो गुटेरेझ लुना – मेक्सिकन चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष यांनी एकत्रितपणे उद्घाटन केले.
ऑरगॅनिक मैत्री उद्यान – भारत आणि मेक्सिको स्थापन करण्यासाठी युपीएल जबाबदार असून त्याद्वारे कंपनीच्या नॅचरल प्लँट प्रोटेक्शन (एनपीपी) बिझनेस युनिट पोर्टफोलिओमधून शाश्वत जैवसुविधा व तंत्रज्ञान पुरवले जाते. या सुविधा मातीचे आरोग्य जपतात आणि पाण्याचा प्रभावी वापर करतात तसेच उद्यानातील झाडे व जैवविविधतेला चालना देतात. भारतात युपीएलने निकृष्ट झालेली वने व जमिनींच्या पुनर्वसनासाठी मोहीम हाती घेतली आहे. कंपनी स्थानिक भागधारकांना सहभागी करून घेत रोप ते जंगल धोरण राबवून वनाच्छादित जमीन वाढवण्यावर भर देते. समाजाला प्रोत्साहन देत या जंगलांच्या देखभालीसाठी प्रशिक्षित केले जाते व युपीएलद्वारे त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जातात.
लोकसभेचे अध्यक्ष ए. ई. श्री. ओम बिर्ला म्हणाले, की आज उद्घाटन करण्यात आलेले उद्यान दोन्ही देशांतील मैत्री आणखी बळकट करेल आणि त्याचा सुगंध इतर देशांपर्यंत पोहोचेल.
डिप. सर्जियो गुटेरेझ लुना – मेक्सिकन चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष म्हणाले, की चेंबर ऑफ डेप्युटीजला देण्यात आलेल्या या सुंदर बगिचारूपी भेटीने आम्ही भारावून गेलो आहोत. हे उद्यान भारत व मेक्सिको यांची स्वतंत्र ओळख तयार होण्यापूर्वीपासून त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या शतकभर जुन्या मैत्रीचे प्रतीक आहे.
मेक्सिकोमधील भारताचे राजदूत एच. ई. पंकज शर्मा म्हणाले, की हे ऑरगॅनिक मैत्री उद्यान भारत व मेक्सिकोमधील दृढ मैत्रीची अभिव्यक्ती असून युपीएलने मेक्सिकोमधील हवामान व वने लक्षात घेऊन त्याची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मानव व निसर्गातील सेंद्रीय नाते जपण्याचाही प्रयत्न आहे.
भारत व मेक्सिको मैत्री समूहाचे अध्यक्ष डिप. साल्वाडोर कॅरो कॅब्रेरा म्हणाले, की हे उद्याने मैत्रीचे प्रतीक म्हणून कायम अस्तित्वात राहील.
युपीएल एलएटीएएम प्रादेशिक विपणन संचालक अमित अगरवाल म्हणाले, की युपीएल मेक्सिको व तिथल्या शेतकऱ्यांसाठी इतिहासाचे संवर्धन करतो आणि एक नवा उपक्रम अस्तित्वात येताना पाहाणे अनोखे आहे. हे बहारदार उद्यान हवामानाच्या दृष्टीने स्मार्ट सुविधा व तंत्रज्ञान कशाप्रकारे शाश्वततेची नवी समीकरणे मांडण्यासाठी व पर्यायने झाडांचे व आपल्या पृथ्वीचे आरोग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते याचे उत्तम उदाहरण आहे.उद्घाटन दिनी युपीएल एलएटीएएम प्रादेशिक विपणन संचालक अमित अगरवाल एलआयसी, रॉबर्टो एक्सलांते – जनरल डिरेक्टर मेक्सिको आणि क्युबा व इतर टीम सदस्यांचे प्रतिनिधीत्व केले.