पुणे- कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभाग क्र. ३९,धनकवडी-आंबेगाव पठार येथील राजमाता जिजाऊ बहुउद्दशीय हॉल, श्रेयस गार्डन, मोहननगर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या विशेष प्रयत्नातून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
आज या केंद्रांचे उदघाटन खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. या भागातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन कोविड विरूध्दच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आ.तापकीर म्हणाले नगरसेविका वर्षा तापकीर धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार आणि वैद्यकीय अधिकारी विद्या नागमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले.

यावेळी माजी नगरसेविका मोहीनी देवकर,गणेश भिंताडे, भा.ज.प. खडकवासला युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, सरचिटणीस विक्रांत तापकीर, देविदास मोरे, रामचंद्र मोरे, उमेश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

