पुणे, दि. 9 :- राज्य महिला आयोगाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन जागतिक महिला दिनी विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, चर्च रोड, पुणे-3 यांच्या कार्यालयात ससून हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्ना यादव यांच्या उपस्थितीत झाले, असल्याची माहिती महिला व बाल विकास उप उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी सहायक आयुक्त (नियोजन) मनिषा बिरारीस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता ओव्हाळ, ऊषा जाधव, उज्वला जाधव तसेच महिला व बालविकास विभागातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होते. डॉ. स्वप्ना यादव यांनी स्त्रियांचे आजच्या काळातील मानसिक ताण व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच उपआयुक्त डी. एल. मुंढे यांनी पुरोगामीपणा सोडून सर्व महिलांनी कालानुरुप स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे असले बाबत मत यावेळी व्यक्त केले.
पिडीत महिलांनी व अशा महिलांना मदत करु इच्छिणा-यांनी दूरध्वनी क्रमांक 020-26112004 तसेच श्रीमती अंजना मोझर यांच्याशी 8689840222, श्रीमती स्मिता शिंदे- 7387934588 या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा ईमेल आयडी div.wcd.pune1@gmail.com किंवा समक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास उप उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाचे महिला दिनी उद्घाटन
Date:

