पुणे- कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज वसाहतीच्या प्रवेश द्वारी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि विकास निधीतून उभारण्यात आलेल्या आकर्षक कमानीचे उद्घाटन काल सायंकाळी संपन्न झाले . माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे , उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर ,सभागृह नेते गणेश बिडकर , भाजपचे संघटक सचिव राजेश पांडे आदी मान्यवर नेते कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते . भीमशक्ती तरुण मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या वस्तीच्या वैशिष्ट्यांसह कमानीच्या वैशिष्ट्यांची माहिती यावेळी आपल्या पप्रास्तविकातून उमेश गायकवाड यांनी दिली .तर दिनेश गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .जी कामे कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या काळात होऊ शकली नाही ती राज्यात भाजपने केली तसेच गायकवाड या बंधूंनी देखील आपल्या प्रभागात प्रचंड विकास कामे करून दाखविली आणि जनतेच्या गरजा ओळखून वेळोवेळी जनतेच्या मदतीसाठी उपक्रम राबविले अशा शब्दात उमेश आणि दिनेश गायकवाड या बंधूंचे वक्त्यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले.
संत गाडगे महाराज वसाहतीच्या प्रवेश द्वारी आकर्षक कमानी चे उद्घाटन संपन्न
Date:

