कल्याण ज्वेलर्सच्या १५०व्या दालनाचे दिल्ली एनसीआर मध्ये उद्घाटन

Date:

पंजाबपश्चिम बंगाल आणि केरळच्या प्रादेशिक ब्रँड अँबेसिडरतर्फे दालनाचे उद्घाटन

दिल्ली: भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड पैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या नॉयडा द ग्रेट इंडिया प्लेस जीआयपी मॉल आणि वेगास मॉल, द्वारका येथील नव्या कोऱ्या करकरीत दालनांचे उद्घाटन आज झाले. कल्याण ज्वेलर्सच्या प्रादेशिक ब्रँड अँबेसिडर्स वामिका गब्बी (पंजाब), मंजू वॉरियर (केरळ) आणि रिताभरी चक्रबर्ती (पश्चिम बंगाल) यांच्यातर्फे या दालनांचे उद्घाटन झाले. विविध बाजारपेठांमध्ये आपला व्यापक ठसा उमटविताना भारत आणि मध्य-पूर्वेत १५० दालनांचा मैलाचा दगड ब्रँडने पार केला आहे.

या उद्घाटनप्रसंगी कल्याण ज्वेलर्सची पंजाबची प्रादेशिक ब्रँड अँबेसिडर वामिका गब्बी म्हणाली, “कल्याण ज्वेलर्सशी सहयोग केल्यापासून आजवर अनेक दालनांच्या उद्घाटनाचा मी एक भाग होते. पण आजचे उद्घाटन १५० व्या दालनाचे उद्घाटन असल्यामुळे विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे.”

केरळची प्रादेशिक ब्रँड अँबेसिडर मंजू वॉरियर म्हणाली, “२०१३ पासून मी कल्याण ज्वेलर्स सोबत काम करत आहे आणि या महत्वपूर्ण, मापदंड प्रस्थापित करणाऱ्या क्षणाचा मी एक भाग असल्याबद्दल माझ्या मनात अभिमानाची आणि आनंदाची भावना आहे.”

पश्चिम बंगालची प्रादेशिक ब्रँड अँबेसिडर रिताभरी चक्रबर्ती म्हणाली, “पश्चिम बंगाल मधील आणि आता दिल्लीमधील कल्याण ज्वेलर्सच्या दालनांना भेट दिऊन आल्यानंतर मला विशेष नमूद करावेसे वाटते ते म्हणजे या ठिकाणी असणारी उपलब्ध डिझाईन, दागिन्यांची विस्तृत मालिका. त्या त्या भागाच्या वैशिष्ट्यांनुसार दागिन्यांच्या डिझाईन मध्ये करण्यात येणारे बदल तर फारच विशेष. आगामी वर्षांमध्ये कल्याण ज्वेलर्स एका नव्या उंचीवर पोहोचेल. त्या साऱ्या प्रवासाचा एक भाग होण्याची माझी इच्छा आहे.”

नवीन दालनांबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.टी.एस.कल्याणरामन म्हणाले, “आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप विशेष क्षण आहे. दिल्ली एनसीआर मधील दोन नवीन दालनांसह कल्याण ज्वेलर्स भारत आणि मध्य पूर्वेतील १५० दालनांच्या सोनेरी मैलाच्या दगडावर पोहोचला आहे. ग्राहकाला प्रथम प्राधान्य असलेला ब्रँड अशी ओळख असणाऱ्या आमचे प्राधान्य हे नेहमीच आमच्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर जास्तीत जास्त मौल्यवान गोष्ट कशी मिळवून देता येईल याकडे असते. आमच्या दालनांमधून ग्राहकांना विस्तृत उत्पादन मालिका अनुभवायला मिळते. त्याजोडीलाच आमच्या दालनांना भेट देणाऱ्या ग्राहकांना सुरक्षीत आणि खरेदीचा सर्वोत्तम अनुभव मिळतो. महत्वाच्या बाजारपेठांमध्ये आम्ही आमचा ठसा विस्तारण्याचा सातत्याने प्रयत्न करत असताना ग्राहकांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करायला आम्हांला आवडेल.”

उद्घाटन सवलतीचा एक भाग म्हणून या दालनांमध्ये ग्राहकांना मूल्यवर्धित भर किंवा सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर २५ % पर्यंतची कॅशबॅक मिळू शकणार आहे. त्यात मूल्यवर्धित भर प्रत्येक ग्रॅमला १९९ रुपये इतकी कमी पासून सुरु होत असली तरी मिळणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांवर तसेच मौल्यवान खडे आणि त्यांच्या दागिन्यांवरही २५ % पर्यंतची कॅशबॅक आणि खड्यांच्या दरांवर २०% कॅशबॅक मिळणार आहे. तत्काळ रिडीम होणारी व्हाऊचर यांच्या रुपातही कॅशबॅक मिळवता येऊ शकेल आणि या सवलत योजना भारतातील सर्व दालनांमध्ये ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या संभाव्य खरेदी मूल्याच्या १०% रक्कम आधी भरून गोल्ड रेट प्रोटेक्शन योजनेचा पर्यायही निवडू शकतात.

कल्याण ज्वेलर्सने ‘वुई केअर’ या कोव्हीड १९ मार्गदर्शन तत्वांचा अंगीकार करताना कंपनीने आपले कर्मचारी आणि ग्राहक यांच्या आरोग्य आणि सुरक्षितता यांची काळजी घेताना सगळ्या दालनांमध्ये सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची सर्वोच्च खबरदारी घेतलेली आहे.

ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांवर कल्याणच्या नव्या ४-लेव्हल अॅश्युएरन्स सर्टिफिकेटचे फायदे मिळविणेही शक्य होणार आहे. कल्याण ज्वेलर्स मध्ये मिळणाऱ्या दागिन्यांनी शुद्धतेच्या अनेक कसोट्या पार केलेल्या असल्या आणि सगळ्या बीआयएस हॉलमार्क चाचण्या दिलेल्या असल्या तरी ४-लेव्हल अॅश्युएरन्स सर्टिफिकेटमुळे ग्राहकांना पुन्हा विक्रीसाठी आणताना किंवा दागिना बदलून घेताना इनव्हॉईस मध्ये लिहिल्याप्रमाणे शुद्धतेनुसार मूल्य परतावा मिळेल याची शाश्वती राहील. जोडीलाच देशातील कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही दालनामध्ये कधीही दागिन्यांचा नी:शुल्क मेंटेनन्स करण्याची खात्री मिळेल.

कल्याण ज्वेलर्स भारतभरातील आपल्या ग्राहकांसाठी लोकप्रिय वेधा (हेरीटेज दागिने), तेजस्वी (पोलकी ज्वेलरी), मधुर (हस्तकौशल्यावर आधारित प्राचीन दागदागिने), निमाह (टेम्पल ज्वेलरी) आणि ग्लो (चकाकते हिरे) या ब्रँडसह मुहूर्त ही नववधूंसाठीच्या दागिन्यांची मालिका सादर करणार आहेत. दालनाच्या इतर विभागांत झियाह (सॉलीटेअर- हिऱ्यांच्या दागिन्यांसारखे), अनोखी (अनकट हिरे), अपूर्वा (विशेष कार्यासाठी हिरे), अंतरा (विवाहासाठी हिरे), हेरा (रोजच्या वापरासाठीचे हिरे) आणि रंग (मौल्यवान खडे दागिने) यांचा समावेश आहे. कल्याण ज्वेलर्स त्यांच्या पोर्टफोलिओ मधून एक लाखाहून अधिक समकालीन आणि पारंपरिक डिझाईन उपलब्ध करून देणार असून दररोज तसेच विवाह प्रसंगी आणि सणासुदीच्या काळात निवड करता येऊ शकेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...