Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उत्तराखंडातील माणा गाव येथे उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिराचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा

Date:

पुणे, १६ ऑक्टोबर: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी  शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने माणा गाव, बद्रिनाथ धाम, जि.चमोली, उत्तराखंड येथे उभारण्यात आलेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिराचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री. भगतसिंग कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्र सिंह रावत हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे असतील. तसेच, सुप्रसिद्ध विद्वान, विचारवंत आणि कवी श्री. किशन शर्मा, मौलाना आजाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. फिरोजशहा बख्त अहमद, सरस्वती धाम मंदिराचे पुजारी श्री. बद्रिनारायण भट व ह.भ.प. श्री. तुळशीराम दादाराव कराड हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. माणा ग्रामपंचायतीचे प्रधान श्री. पीतांबर सिंह मोलपा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विश्‍वगानसम्राज्ञी भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर व थोर विचारवंत आणि अध्यात्मिक गुरू परमपूज्य श्री.श्रीकृष्ण कर्वे गुरूजी हे शुभाशीर्वाद देतील.
शुक्रवार, दि.२२ ऑक्टोबर २०२१ ते बुधवार, दि.२७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत दररोज सकाळी ११.१५ वाजता होणार्‍या कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री ना.श्री. पुष्कर सिंह धामी, केंद्रीय रेल्वे राज्यमंंत्री ना.श्री. रावसाहेब दानवे, केरळचे राज्यपाल महामहिम   डॉ. अरिफ मोहम्मद खान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ना.श्री. राजेश टोपे, नेदरलँड येथील सुप्रसिद्ध विचारवंत, तत्त्वज्ञ आणि कवयित्री डॉ. पुष्पिता अवस्थी व जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिर

भारतातील पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांमधील एक प्रमुख तीर्थक्षेत्र बद्रिनाथ (श्री विष्णू) धाम मंदिर, जिल्हा चमोली, उत्तराखंड येथील पवित्र आणि पावनभूमीमध्ये श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये श्री सरस्वती मातेची मूर्ती, भगवान श्री गणेश, ज्ञान पंढरीचे श्री विठ्ठल रुक्मिणी, भगवान श्री दत्तात्रेय, वायुपुत्र श्री हनुमान आणि महाराष्ट्रातील महान तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर महाराज व संतश्री तुकाराम महाराज, भगवान श्री वेदव्यास यांच्या मूर्तींचीे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सरस्वती नदीच्या उगमापासून ज्या नरनारायण पर्वतमार्गाने पांडवांनी स्वर्गारोहण केले, त्या मार्गावर धर्मराज युधिष्ठिर, गदाधारी भीम, धनुर्धारी अर्जुन, सत्यवादी नकुल, मानवतावादी सहदेव व माता द्रौपदी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठपूर्वक स्थापना केली जाईल.
सन २००९ मध्ये श्री बद्रिनाथ धाम येथे प्रख्यात संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, महान योगगुरू शतायुषी श्री रामचंद्र गोपाल शेलारमामा, साप्ताहिक हिंदी ब्लिट्झचे संपादक  श्री नंदकिशोर नौटियाल, प्रख्यात रेडिओ उद्घोषक श्री. किशन शर्मा, प्रख्यात शास्त्रज्ञ  डॉ. विजय कुमार दास, माझ्या ज्येष्ठ भगिनी पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड व मी दर्शनासाठी गेलो होतो. श्री बद्रिनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण माणा गाव येथील माता सरस्वती नदीचे मूळ उगमाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. दर्शन घेतल्यानंतर माझ्या आणि डॉ. विजय भटकर यांच्या मनात एकदम असा विचार आला की, देवी सरस्वतीला समर्पित, सुंदर आणि आकर्षक असे मंदिर या ठिकाणी बांधले जावे. योगायोगाने माणा गावचे प्रमुख   श्री. पितांबर सिंग मोलपा यांची भेट झाली. त्यांच्याशी या मंदिराच्या उभारणी संबंधी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी त्याला मान्यता देऊन सर्वेतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. आम्ही दोघांनी मिळून श्री सरस्वती माता मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि या मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली. आता ते मंदिर पूर्ण झालेले आहे. याच मंदिराचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा गुरुवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे.

॥ श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह ॥

“विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती नांदेल” या स्वामी विवेकानंदांच्या वचनावर नितांत श्रध्दा व निष्ठा ठेऊन सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याचा, लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून वारकारी संप्रदायाच्या परंपरेनुसार श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिर, माणागांव, श्रीक्षेत्र बद्रिनाथ,  जि. चमोली, उत्तराखंड येथे श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान श्रीमद्भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, गाथा, भजन, ज्ञानेश्‍वरी पारायण, श्रीमद्भागवत कथा, प्रवचने, हरिपाठ व कीर्तनाचे विविध कार्यक्रम गुरुवार, दि. २१ ऑक्टोबर २०२१ ते बुधवार, दि. २७ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान होणार आहेत.

या सप्ताहामध्ये ह.भ.प.श्री बापूसाहेब मोरे देहूकर, हरिहर महाराज दिवेगावकर, डॉ. सुदाम महाराज पाणेगावकर, धर्मराज महाराज हांडे, अर्जुन महाराज लाड, नारायण महाराज उत्तरेश्‍वर पिंपरीकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, बाबा महाराज बोर्‍हाडे व रविदास महाराज शिरसाट हे आपली कीर्तनरुपी सेवा सादर करणार आहेत.
ज्ञानतीर्थ क्षेत्र आळंदी देहू ते ज्ञानतीर्थ क्षेत्र श्री सरस्वती धाम, बद्रिनाथ अशी विश्‍वशांती दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...

सदाबहार गीतांनी रसिकांची सायंकाळ ‘हसीन’

पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या...

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. 10...

तुळापूर–वढू (बु.) शिवस्मारक विकासाला गती; ५३२.५१ कोटींचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ...