आंदर मावळातील डोंगरकुशीतले कोविडग्रस्त ‘कळकराई’ प्रकाशले

Date:

पुणे, दि. 9 मे 2021मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम व सह्याद्री डोंगरांनी वेढलेल्या व सध्या कोविडग्रस्त असलेले कळकराई गाव सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीतील तुटलेल्या वीजतारांची दुरुस्ती केल्यानंतर शनिवारी (दि. 8) सायंकाळी पुन्हा प्रकाशले आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे खडतर काम पूर्ण केले आहे.

आंदर मावळातील अतिदुर्गम व 55 वीजग्राहकांचे कळकराई गाव मावळ, खेड व कर्जत तालुक्यांच्या सिमेवर आहे. या गावात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याने अर्धे ग्रामस्थ गावाबाहेर तर अर्धे ग्रामस्थ घरातच आहेत. मुख्य ग्रामपंचायत असलेल्या सावळा गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत डोंगरपायथ्याच्या या गावात पायवाटेने जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही. महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे सावळा येथे रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे कळकराईला वीजपुरवठा केला जातो. यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगरपायथ्याशी चार वीजखांबाचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असून त्यावरील सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीमधून वीजतारा टाकण्यात आल्या आहेत.

गेल्या सात दिवसांपूर्वी आंदर मावळात अवकाळी वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यामध्ये दरीत असलेल्या सुमारे 800 मीटर लांबीच्या तीनही वीजतारा तुटल्या आणि कळकराई गावामधील वीजपुरवठा खंडित झाला होता. अतिशय खोल व कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्तीचे काम अतिशय जिकरीचे व आव्हानात्मक होते. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वीजपुरवठा ताबडतोब सुरु करणेही आवश्यक होते. तथापि वादळी पावसामुळे निसरड्या डोंगरदरीमध्ये काम त्वरीत सुरु करणे शक्य झाले नाही.

राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संतोष गरूड, मावळचे उपकार्यकारी अभियंता श्री. विजय जाधव यांनी कळकराई गावाला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. त्यानंतर शाखा अभियंता श्री. श्याम दिवटे तसेच 30 जनमित्र व कंत्राटदारांचे कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दि. 7 मे रोजी दुरुस्ती कामाला सुरवात केली व दुसऱ्या दिवशी वीजतारांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करीत सायंकाळी कळकराई गावाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ग्रामस्थांनी देखील कोरोनाच्या प्रादुर्भावात व अतिदुर्गम भागात ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध,...

जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.२४: जल जीवन मोहिमे अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची भौतिक...