पुणे- पुणे महानगरपालिकेच्या २०१७ ते २०२१ या पंचवार्षिकेत विकासाच्या दृष्टीने सक्षम असे एकही काम सत्ताधारी भाजप पक्षाने केलेले दिसत नाही. स्मार्ट सिटी ही फक्त फ्लेक्स, बॅनर्सवर असून; वास्तविक पुणे शहर हे खड्डाचे शहर बनले हेच यातील सत्य आहे. विकास पुरूषाने पुण्यातील कोणते प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले; पुण्यातील जनतेला स्पष्ट सांगावे. रोपे लावण्याचे तथा रोपांना पुर्ण झाड बनविण्याची काम इतरांनी करायचे, मात्र परिपक्व झाडांची फळे तोडून वाटायला तुम्ही पुढे आलात याचा अर्थ सर्व श्रेय तुम्हालाच मिळाव ही मानसिकता विकासाची नाही. आम्ही पुण्यातील मतदार सर्व परिस्थिती योग्य रित्या जाणून आहोत. त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जाईल हा जनसामान्य पुणेकरांचा कौल आहे. असे स्पष्ट दिलखोस चर्चा मंडई विद्यापीठ कट्टावर सामान्य कार्यकर्त्यांनी केले.
आज मंडई विद्यापीठ, पुणे कट्टावर संतोष भूतकर, चंदन सुरतवाला, आनंद सागरे, राजेन्द्र पवार, जवान बासुंदीवाले, सुरेश कांबळे, राजेन्द्र आलमखाने, अनिल बांदिरगे, समीर शेख, जयराज वाडेकर, राजू चव्हाण, रवि किरवे, हर्षद मालुसरे आदी प्रतिष्ठीत पुणेकर मंडळी आमंत्रित करण्यात आले होते. पुण्याचा इतिहास, वारसा, संस्कृती, शिक्षण पद्धती, शहराच्या विविध प्रश्नावर, तसेच सामाजिक व राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात आदी अनेक मुद्यावर मंडई कट्टावर चर्चा झाली. मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला.
बाळासाहेब मालुसरे म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात, आजतागायत कट्टावर २५०० हून अधिक मान्यवर येऊन गेले. विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे समविचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते. त्याच क्रमांत पुणे शहर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज शहरातील प्रमुख व काही प्रतिष्ठीत पदाधिकारी आमंत्रित केले होते. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात या आभ्यासू पुणेकरांचा काय कौल आहे यावर आज चर्चा झाली. कट्टावर मनसोक्तचर्चा केली याबद्दल सर्वांचे आभार देखील मानले.

