केंद्र सरकारच्या ‘पाळत’ प्रकरणी डॉ. सप्तर्षींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आंदोलन

Date:


पुणे- इस्त्राईल देशातील एका खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील अनेक नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांवर तसेच पत्रकारांवरही केंद्र सरकारने पाळत ठेवल्याचा गंभीर आरोपाच्या प्रकरणावरून केंद्र सरकारच्या या तथाकथित हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने आज पुण्यातील गांधी भवन येथे मूक आंदोलन करण्यात आले.


न्यायपालिका, संसद, प्रशासन व प्रसारमाध्यमे हे आपल्या लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत. विदेशातील एका खाजगी कंपनीचे “Pegasus” नावाचे सॉफ्टवेअर वापरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, देशाचे निवडणूक आयुक्त, विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सरकारमधील मंत्री तसेच अनेक पत्रकारांवर पाळत ठेवल्याचा आरोप करत केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाहीच्या चारही स्तंभांना सुरुंग लावल्याचा ठपका भाजपाविरोधी पक्षांनी ठेवला आहे. अनेक देशबांधवांच्या बलिदानाने उभी राहिलेली ही लोकशाही उध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सर्व प्रयत्न केले जातअसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता या देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून केंद्रातील हुकूमशाही सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करून यावेळी
केंद्र सरकारच्या या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी आता देशातील सर्व नागरिकांनी एकजूट होण्याची आवश्यकता प्रतिपादित करण्यात आली आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ ,काँग्रेसचे मोहन जोशी, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे , तसेच नितिन कदम,हर्षल मानकर ,बाळासाहेब बोडके , राजलक्ष्मी भोसले ,गजानन थरकूडे , शाम देशपांडे , विकास दांगट , रविन्द्र माळवदकर , विजय डाकले , संतोष ढोक , ज्योती सुर्यवंशी , आनंद तांबे , प्रमोद शिंदे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन जोशी यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर...

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २४६ पैकी १२८ नागरिक सुखरूप परत

९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही पुणे, दि....