पुणे: ”मी मोदी या गाव गुंडाबद्दल बोललो होतो, पण माझ्या विरोधात आंदोलन करून भाजपच्याच लोकांनी पंतप्रधान पदाची गरीमा राखली नाही. आपण संस्कृत असल्याच आव आणणारी पण दंगेखोर अशी भाजपची लोक आहेत. पुण्यात माझे पुतळे जाळले, चुकीचे फ्लेक्स लावले. याच पद्धतीने पुण्यात किडक्या विचारांच्या लोकांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर घाण फेकली होती.केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या लोकांना केंद्र सरकार अटक करत आहेत. त्यापेक्षा पुणे महापालिकेचे आॅडिट करून येथील लोकांना जेलमध्ये घाला. पुणे आणि पिंपरीचिंचवड हे काँग्रेसच्या विचाराला मानणारी शहरे असून, या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेस तर्फे आयोजित परिवर्तन रॅलीमध्ये नाना पटोले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार संजय जगताप, उल्हास पवार, दीप्ती चवधरी, आबा बागूल, अरविंद शिंदे , अभय छाजेड़, अविनाश बागवेआदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, भाजपने बेरोजगारी, महागाई वाढवली. आता भाजपकडे पैसा आणि पॉवर असली तरी लोक भाजपला नाकारत आहेत. कॅनडाध्ये जसे तेथील पंतप्रधानांना पळ काढावा लागणार तशीच स्थिती भारतात देखील निर्माण होणार आहे. हा देश आणि संविधान फक्त काँग्रेसच वाचवू शकतो हाच संकल्प घेऊन प्रभागात जा, असे आवाहन पटोले यांनी केले.
पाण्यासाठी जादा दराने निविदा आणून भ्रष्टाचार
काँग्रेसने व्यवस्था केली पाहून आज पुण्याला पाणी मिळत आहे, भाजपने २४ तास पाणी देण्यासाठी योजना आणली, पण त्याची निविदा एक हजार कोटीने जास्त होती. काँग्रेसची महापालिकेत सत्ता आणा आम्ही कमी दराने निविदा आणून पाणी पुरवठा योजना करू. भाजपला जादा दराने निविदा आणून भ्रष्टाचार करायचा आहे, अशी टीक पटोले यांनी केली.गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले हे स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असे सांगत असले तरी पुण्यातील ‘परिवर्तन रॅल’मध्ये आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करणार की स्वबळावर निवडणूक लढवणार यावर भाष्य केले नाही. तसेच त्यांच्या ३० मिनिटांच्या भाषणात आघाडीतील घटक पक्षांबद्दल देखील भाष्य केले नाही

