पुणे- महापालिकेचा कर्मचारी नसताना महापालिकेच्या मुख्य भवनातील करसंकलन विभागात बसून कारभार हाकणाऱ्या तोतया कार्माच्याचा पर्दाफाश आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी केलां आहे . मायमराठी डॉट नेट च्या प्रतिनिधींनी या तोतया कर्मचाऱ्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली .
या प्रकरणाची हकीकत अशी कि, महापालिकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य इमारतीत तळमजल्यावर करसंकलन विभागाचे कार्यालय आहे . येथे जाळ्या लावलेल्या एका विभागात हा तोतया येथील गणेश नावाच्या क्लार्क च्या खुर्चीवर बसून महापालिकेचा संगणकावर काम करताना आज सायंकाळी शिंदे आणि बागवे यांनी रंगेहाथ पकडला . याच्याकडे जॉईनिंग लेटर आणि ओळखपत्राची कॉपी मागितली असता , आपण महापालिकेचे कर्मचारी नसल्याचे त्याने सांगितले .
दरम्यान हा तरुण येथे अनेक महिन्यांपासून पालिकेच्या सेवेत नसतानाही बिनपगारी कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती मायमराठी ला मिळाली होती .या शिवाय याने स्वतःला सहायक म्हणून दरमहा काही पैसे वेतन म्हणून देवून एका तरुणीला आपल्याकडे कामास ठेवले होते .
पहा या घटनेचा प्रत्यक्ष पर्दाफाश करणारा हा व्हिडीओ…..