असलम बागवान यांची कारवाईची मागणी
पुणे :
कोंढवा भागात ऐन पावसाळ्यात चेंबर फुटून रस्त्यावर सांडपाणी येण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना आरोग्याची काळजी निर्माण झाली आहे. प्रभाग २७ मधील सर्व चार नगरसेवकांनी निधी देऊनही कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हे प्रकार घडत असल्याचा आरोप इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हा आरोप केला आहे.
आशीर्वाद रोड येथील चेतना गार्डन येथील चेंबरचे पाणी ओसंडून वाहण्याचा प्रकार पावसाळ्याच्या सुरुवातीस घडला.येथे चेंबरची सफाई करताना मानव अधिकाराचेही उल्लंघन करण्यात आले.एका सफाई कामगारास चेंबरमध्ये उतरवून त्याच्याकडून सफाई करून घेतली गेली.असे प्रकार वाढत आहेत. २०१७ ते २०२१ या कालावधी मध्ये ड्रेनेज बनविणे,स्वच्छ करणे,दुरूस्ती करणे या करीता वार्ड स्तरिय निधी तसेच टेंडर, बजेट याचा हिशोब मागणे अत्यंत गरजेचे आहे,निधीचा वापर टेंडर मधील अटीशर्ती नुसार झालेला आहे का याची चौकशी व्हावी,असेही बागवान यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोंढव्यात सांडपाणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले
Date:

