डिसेंबरमध्ये भरारी पथकाने पकडल्या 3 कोटी 68 लाखाच्या विजचोऱ्या

Date:

139 अनियमितता प्रकरणात 3 कोटी 86 लाखाची दिली बिले

पुणे : महावितरणच्या भरारी पथकाने डिसेंबरमध्ये भोसरी, उरुळीदेवाची व इस्लामपूर येथे धाड टाकून तीन कोटी 68 लाख रुपयांच्या 135 वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या 139 प्रकरणात 3 कोटी 86 लाखाची बिले देण्यात आलेली आहे.

पुण्यातील भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकुन बेकरी प्रोडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने एक लाख 55 हजार युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 21 लाख, 89 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत उरुळीदेवाची परिसरातील पेट्रोल पंप व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. या ग्राहकांनी एल. टी. केबलला टॅपिंग करून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. सदर ग्राहकांनी 39 हजार 627 युनिट्सची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून त्याला 16 लाख 18 हजार 420 रुपयांचे बिल देण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे स्वीट मार्ट व्यावसायिकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याने त्याला 76 हजार 504 युनिटचे रुपये 17 लाख 52 हजार रुपयांचे बिल देण्यात आलेले आहे. 

यासोबतच पुणे शहर व इस्लामपूर शहरातील इतर भागात धाडी टाकून एकूण 135 विजचोऱ्या पकडल्या तर इतर अनियमिततेची 139 प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीविरुद्ध भरारी पथक मोहिमा राबवित आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...