भारत-पाक , युद्ध झाले तर भारत जबाबदार – इम्रान खान

Date:

इसलामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, आम्ही युद्धासाठी तयार आहोत आणि जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर यासाठी सर्वस्वी भारत जबाबदार असेल. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसावर पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये आले होते. येथे त्यांनी लोकांना संबोधित केले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यावर आणि राज्याची पुनर्चना केल्यामुळे पाकिस्तान गडबडून गेला आहे. पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान कधीही युद्धासाठी तयार आहे आणि जर भारत-पाकमध्ये युद्ध झाले, तर त्याला भारत जबाकाश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, असे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने यावेळी म्हटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद न मिळाल्यानंतर पाकिस्तानने आता युद्धाची धमकी देणे सुरु केले. यापूर्वीही पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली होती. काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले. भारताने यावर तुर्तास कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. “नरेंद्र मोदींनी हे जे कार्ड खेळले, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचाच एक भाग होता. काश्मीरमध्ये जे पाऊल उचलले, त्याने कर्फ्यू हटल्यानंतर काय परिस्थिती होईल याची आम्हाला भीती आहे. एवढी फौज पाठवा, नंतर पर्यटकांना काढून द्या एवढे करण्याची काय गरज होती. हे काय करायला निघाले आहेत? मी याला नरेंद्र मोदी यांचे धोरणात्मक ब्लंडर मानतो. त्यांनी त्यांचे शेवटचे कार्ड वापरले. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हे महागात पडणार आहे,” अशी पोकळ धमकीही इम्रान खानने दिली. भारत काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीतीही इम्रान खानने व्यक्त केली. “आम्हाला माहिती मिळाली आहे. सुरक्षेसंबंधी बैठक झाली, पाकिस्तान सैन्याला भारताच्या प्लॅनविषयी पूर्ण माहिती आहे. पुलवामानंतर भारताने ज्या पद्धतीने बालाकोटमध्ये कारवाई केली, त्यापेक्षाही भयंकर कारवाईचा प्लॅन पीओकेमध्ये केल्याची आम्हाला माहिती आहे. मी नरेंद्र मोदींना इथून आव्हान देतो, की तुम्ही  कारवाई करा, आम्ही त्याला सडेतोर उत्तर देऊ.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...