पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, अमेरिका काश्मीरप्रश्नी भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करणार का? त्यावर इम्रान आणि ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया…
> इम्रान : अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. भारतीय उपखंडात शांतता स्थापन करण्यात तो महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. मला वाटते की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नेतृत्वात हा सर्वात शक्तिशाली देश दोन्ही देशांना (भारत-पाक) साहचर्यात आणू शकतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. चर्चा सुरू करणे आणि मतभेद मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यात प्रगती झाली नाही. आशा आहे की, राष्ट्रपती ट्रम्प ही प्रक्रिया पुढे नेऊ शकतील.
> ट्रम्प : दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती. त्यांनी मला विचारले होते की या प्रश्नी तुम्ही मध्यस्थ होणे पसंत कराल का? मी विचारले, कोणत्या प्रश्नी? ते म्हणाले काश्मीर. हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. मी म्हणालो, मला मदत करता आली तर मला आनंदच होईल. तुम्ही मला मध्यस्थ बनवाल तर मी तयार आहे.
> इम्रान : मी आता सांगू शकतो की, तुम्ही हा प्रश्न सोडवण्यास मध्यस्थी केली तर तुम्हाला कोट्यवधी लाेकांचे आशीर्वाद मिळतील.
> ट्रम्प : मला वाटते की हा प्रश्न सुटेल. मात्र, त्यांचेही (मोदी) विचार असेच असणे आवश्यक आहे. यावर मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल.