आय.एम.ई.डी मधील ‘एक्सप्रेशन्स २०१७’ची सांगता
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.)च्या वतीने आयोजित अभिव्यक्ती उत्सव (एक्सप्रेशन २०१७) ची सांगता नुकतीच झाली. या ‘एक्सप्रेशन्स २०१७’ महोत्सवामध्ये ८४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
सुलियाना माईया (न्यूझिलँड उच्च आयोगाच्या सल्लागार, टोंगा गणराज्य), राकेश स्वामी (वरिष्ठ सरव्यवस्थापक जॉन डियर), डॉ. जयंत ओक (व्यवस्थापकीय सल्लागार) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘एक्सप्रेशन २०१७’चा समारोप झाला. डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी डॉ.अजित मोरे, डॉ.बी.यु. सांख्ये, डॉ.प्रविण माने, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. प्रविण माने यांनी या ‘एक्सप्रेशन्स २०१७’ महोत्सवाचे संयोजन केले होते.
कला, क्रिडा, नृत्य, सांस्कृतिक आणि व्यवस्थापन विषयक खेळांच्या विविध अभिव्यक्ती सादर करीत आय एम ई डी च्या विद्यार्थ्यांनी ‘एक्सप्रेशन्स २०१७’ ला चांगला प्रतिसाद दिला.
या तीन दिवसीय अभिव्यक्ती उत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
प्रमुख पाहुण्या सुलियाना माईया यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे कौतुक केले.
‘पंचतत्व’ या संकल्पनेवर आधारित या अभिव्यक्ती महोत्सवात ‘टर्न टेबल’, ‘बेस्ट मॅनेजर’, ‘ट्रेजर हंट’, ‘काऊंटर स्ट्राईक’, ‘बिझिनेस क्विझ’, ‘डू द डेअर’, गाण्याची स्पर्धा, नृत्य स्पर्धा, ‘फॅशन शो’, ‘अॅड मॅड शो’ या स्पर्धा आणि उपक्रमांचा होता.