Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अबब 830 दस्तांची बेकायदेशीर नोंदणी दोन अधिकारी निलंबीत :दस्त नोंदणीचा कारभार खाजगी व्यक्तींच्या हाथी..पुण्यातला कारभार

Date:

पुणे-‘महारेरा’चा नोंदणी क्रमांक नसलेले 195 तर तुकडाबंदीचे आदेश मोडून 635 अशा 830 दस्तांची बेकायदेशीर नोंदणी केल्याप्रकरणी दोन अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.दुय्यम निबंधक एल. ए. भोसले,सह दुय्यम निबंधक ए. के. नंदकर यांना निलंबित करण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.

शहरात 24 हून अधिक दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी योग्यरीत्या पार पाडली जाते किंवा नाही याची पाहणी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली त्यावेळी, हवेली 14 (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयात बेकायदेशीर 830 दस्तांची नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे.

‘महारेरा’चा नोंदणी क्रमांक नसलेले 195 तर तुकडाबंदीचे आदेश मोडून 635 अशा 830 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी हवेली 14 (भोसरी) दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक आणि सह दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका प्रकरणात वर्गीकरण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सरकारचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ही आढळून आले आहे. एकाच कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

2016 मध्ये राज्य सरकारने महारेराची स्थापना केली. 500 चौरस मीटरच्या आतील अथवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांना तरतुदीनुसार महारेराच्या प्रमाणपत्र नोंदणीतून वगळले आहे. परंतु त्यावरील प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. अशा प्रकल्पातील सदनिकांची विक्री करताना महारेराच्या नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

असे असतानाही हवेली 14 दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकांनी जाणीवपूर्वक नियमांकडे दुर्लक्ष करून 195 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. 10 गुंठ्यांच्या आतील 635 दस्तांची नोंदणी केली आहे त्यामुळे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी या कार्यालयातील दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

या संदर्भात बोलताना नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले, दुय्यम निबंधकाला महारेरा आणि तुकडाबंदी संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे, तर खासगी व्यक्तीच्या माध्यमातून दस्तनोंदणीचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तेथील सह दुय्यम निबंधकालाही निलंबित केले.

खासगी व्यक्तींच्या हातात कारभार
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवेली 22 (एरंडवणा) या कार्यालयालाही भेट दिली.
तपासणीत या कार्यालयात अनेक धक्कादायक प्रकार आढळून आले आहेत.
तपासणीवेळी दुय्यम निबंधक कार्यालयात वेळेवर हजर न होणे,
कार्यालयात खासगी व्यक्तींच्या हातात कारभार देणे,
दस्तनोंदणी सुरू करण्यासाठीचा ओटीपी खासगी व्यक्तीला देणे,
दस्तांचे स्कॅनिंग न करणे असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लिफ्टचे अपघात टाळण्यासाठीनवीन नियम लागू करा-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : हौसिंग सोसायटीतील इमारतींमधील लिफ्टचे अपघात टाळण्यासाठी नवीन...