पुणे- काल नगरसेवकांची पंचवार्षिक सत्राची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज प्रशासकपदाची वाटचाल सुरु केली असून पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून विद्रुपीकरणात भर घालणार्या अनधिकृत व्यावसायीकांना दणका दिला आहे. पदपथ आणि इमारतींच्या ओपन स्पेसवर सुरू असलेले बेकायदा व्यवसाय आणि अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात बोलताना अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले, की शहरातील अनेक रस्ते व पदपथांवर बेकायदा व्यावसायीकांमुळे वाहतुकीला आणि पादचार्यांनाही अडथळा होत आहे. तसेच अनेक इमारतींच्या ओपनस्पेसवर हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू आहेत. याबाबतही नागरिकांकडून तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते व पदपथ मोकळे करून वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार लवकरच जोरदार कारवाई सुरू करण्यात येणार आहे.शहरात मोेठयाप्रमाणावर बेकायदेशीररित्या फ्लेक्स, बॅनर, झेंडे लावण्यात आले आहेत. हे सर्व फ्लेक्स, बॅनर व झेंडे काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाच्या अधिकार्यांनी दिली.शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकिय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत.आजपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कामकाज सुरु केले आहे . पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी शहरातील रस्ते आणि मोकळे करण्यास प्राधान्य दिले आहेत. पदपथ, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या साईड, फ्रंट मार्जीनमध्ये सुरू असलेले पथारी व्यवसाय, हॉटेल्स व अन्य व्यवसाय तातडीने बंद करावेत. तसेच यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्ट्रक्सर्च संबधित व्यावसायीकांनी काढून घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. यानंतरही बेकायदा व्यावसायीक आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.अनेक ठिकाणी तर नगरसेवकांनी उभारलेली पदपथावर महापालिकेच्या निधीतून वाचनालय, पदपथांवरील बेकायदा कार्यालये, वाचनालये देखील हटविण्यात येतील.
रस्ते आणि साईड मार्जीनमधील बेकायदा बांधकामे, व्यवसायांवर कारवाई करणार
Date:

