पुणे- हिम्मत असेल तर सेना, कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ने एक एकटे लढावे मग बघू कुणाला किती मते पडतात .. असे जाहीर आव्हान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. संजय राउत यांनी सकाळी पुण्यात केलेल्या वक्तव्यानंतर दिले आहे. ते म्हणाले,’भाजपवर टीका करणं,ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत.मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही,त्यांना लगेच टोचतं ! तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात,हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे.. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं. महाविकास आघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरी देखील आमचा काही आक्षेप नाही.. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू ! राज्य सरकारला ट्रेन,बस सुरु झाल्यावर त्यामध्ये होणारी गर्दी दिसत नाही,परंतु यांना मंदिर सुरु करण्याआधीच तिथे होणाऱ्या गर्दीची चिंता वाटते ! नेमके आ. पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …..
हिम्मत असेल तर एकेकटे लढा … चंद्रकांतदादांचे जाहीर आव्हान … (व्हिडीओ)
Date:

