भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नसेल तर करा आमच्याशीही युती -एमआयएमची खुली ऑफर

Date:

औरंगाबाद-भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आमच्यासोबत युती करावी. अशी ऑफर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. -राज्यात एमआयएमचा एक खासदार, 2 आमदार आणि 29 नगरसेवक अशी ताकद आहे. यामुळे आता एमआयएमकडून आलेली ऑफर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वीकारणार का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असा नारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला होता. यावर शरद पवारांनी देखील अशीच भूमिका मांडली होती. त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. एमआयएमवर नेहमी आरोप होतो की त्यांच्यामुळे भाजप निवडणूक जिंकते. हे जर बदलायचे असेल तर तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? असा सवाल जलील यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना केला होता.

यावेळी बोलताना काँग्रेसला देखील युती करण्याचे आव्हान दिले आहे. इतर पक्षांना फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत, आम्ही कुणालाही नको आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष कशाला मानतात ?. त्यांनाही मुस्लीम मते हवी आहेत. तर मग यावे आपण युती करु, अशी ऑफर जलील यांनी दिली आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी काहीपण-देशाचे सर्वांत जास्त नुकसान कुणी केले असेल तर ते भाजपने केले आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावे लागणार ते आम्ही करायला तयार आहोत. उत्तर प्रदेशातही आम्ही बसपा आणि सपासोबत बोलणी केली होती. मात्र त्यांना मत हवे आहेत पण आमची साथ नको म्हणून आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिली आहे, अशा शब्दांत जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...