मुंबई-आरेतील 25 टक्के काम पूर्ण झाले आहेत. आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता पुढच्या एका वर्षात हे काम पूर्ण होऊ शकते. कांजूरमार्गाला मेट्रोशेड नेले, तर तिथे बांधकामाला ४ वर्ष लागतील. नाकापेक्षा मोती जड होईल. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो लवकर मिळण्याकरीता पर्यायवरणपूरक निर्णय आम्ही घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणज सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा झाडे कापण्याची परवानगी दिली होती. तेव्हा ही सगळी झाडे मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफटाईममध्ये जेवढे कार्बन सीक्वेस्ट्रेशन करतील. तेवढे कार्बन सीक्वेस्ट्रेशन ही मेट्रो 80 दिवसांच्या फेऱ्यामध्ये पूर्ण करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली होती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, सगळ्यांना माहिती आहे की ती झाडे कापलेली आहेत. आता नव्याने झाडे कापण्याची गरज नाही. काही पर्यायवरण वाद्यांना हे माहिती नसल्याने ते आंदोलन करत नसतील. तर काही पर्यायवरणवादी हे पृरस्कृत आहेत. तथापी सर्व पर्यायवरण प्रेमींचा आदर राखून आवश्यक ती चर्चा आम्ही करू. मात्र, मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्यामुळे मुंबई प्रदुषणामुळे दररोज होरपळत आहे. पण, हे पाप आम्ही जास्त दिवस चालू देणार नाही. तसेच ठाकरे सरकारचे सरसकट निर्णय रद्द करणार नाही. पण, मागच्या सरकारने सूड हेतूने घेतलेले निर्णय अभ्यास करुन रद्द केले जातील, असे त्यांनी सांगितले.

