तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

Date:

पुणे दि.२८: देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च संस्था (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान आणि ओळखपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात तृतीयपंथीयांना आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त रविंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, पुणे मनपा उपायुक्त रंजना गगे, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर आणि विविध तृतीयपंथी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तृतीयपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एकत्रित पुढाकारातून तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्री.पाटोळे यांनी यावेळी सांगितले.

शिबिरात २० तृतीयपंथी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, त्यातील १० व्यक्तींना तृतीयपंथी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच २१ तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्रासाठी नाव नोंदणी केली आहे. आतापर्यंत समाज कल्याण पुणे कार्यालयामार्फत २८५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व ओळखप्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. अधिकाधिक तृतीयपंथी व्यक्तींनी पुढाकार घेऊन ओळखपत्र मिळणेसाठी ऑनलाईनरित्या नोंदणी करावी असे आवाहन उपायुक्त श्री. पाटील यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून...

गॅस एजन्सीवर ही कारवाई, गॅस सिलेंडरचा काळा बाजार

गॅस एजन्सीचा पुरवठा आणि वितरण तात्काळ प्रभावाने बंद ;...

श्रीरामराज्याभिषेक व पायघडी सोहळा तुळशीबागेत उत्साहात साजरा

पुणे : श्रीराम जय राम जय जय राम...  रघुपती...

देशभरातील 76 रेल्वे स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव

सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम...