आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफच्या मोबाईल अॅपने पार केला दहा लाख डाउनलोडचा टप्पा

Date:

·         मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटीशिवाय विमा योजना माहिती घेणे शक्य

·         भारतीय खाजगी जीवन विमा उद्योगातील सर्वाधिक मानांकित अॅप्सपैकी एक

·         मोबाईल अॅपवर ग्राहकांकडून ४ पैकी १ सेवा व्यवहारांची पूर्तता

·         सुरक्षेचे अनेक स्तर- फेस आयडी किंवा पिन किंवा फिंगरप्रिंटद्वारे लॉगिन करता येते

·         24X7 ग्राहक सेवा प्रदान

आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स मोबाईल अॅपने दहा लाख डाउनलोडचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ग्राहकांना त्यांच्या विमा योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरविण्यात आलेल्या सोयीचे हे द्योतक आहे. अॅपवर उपलब्ध असलेल्या नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित वैशिष्ट्यांची ही पावती आहे.

मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसतानाही ग्राहकांना त्यांच्या विमा योजनांबाबतची माहिती मिळविणे तसेच विविध प्रकारच्या सेवा सुरू करणे, थांबवणे यासाठी कंपनीने त्यांचे मोबाइल अॅप अपग्रेड केले आहे. आता, ग्राहकांकडून प्रत्येक चारपैकी एक सेवा व्यवहार मोबाइल अॅपवर केला जातो.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी श्री. मनीष दुबे म्हणाले, “कोविड-१९ महामारीने डिजिटल व्यवहारांना चालना दिली आहे. ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांशी जोडून घेण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि त्यांच्या गरज समाधानकारक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहोत. आमचे नाविन्यपूर्ण आणि अपग्रेड केलेले मोबाइल अॅप आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी चालू असलेला सेवा टचपॉइंट आहे.

आम्ही नेहमीच नवीन युगातील डिजिटल सोल्यूशन्स वापरून नाविन्य आणण्याचा आणि ग्राहकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. नाविन्यपूर्ण मोबाइल अॅप ग्राहकांना त्यांच्या विमा योजनांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करण्यासाठी माहिती मिळविण्याकरता सुरक्षित मोड पुरवते. हे मोबाईल अॅप दहा लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले असून ग्राहकांद्वारे ४ पैकी एका कामासाठी या अॅपचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळेला कुठेही सेवा देता येते ही सोय आमच्यासाठी महत्वाची आहे. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसमुळे भारतीय जीवन विमा उद्योगातील सर्वोत्तम मानांकित अॅप्सपैकी एक असून अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअर या दोन्हीवर आहे.

आमच्याकडे सुरक्षिततेचे अनेक स्तर आहेत आणि ग्राहक फेस आयडी, पिन वापरून लॉगिन करू शकतात किंवा फिंगरप्रिंट लॉगिन मार्ग वापरू शकतात. वापरकर्ता-अनुकूल मोबाइल अॅप म्हणजे ग्राहकांच्या हातात व्हर्च्युअल शाखा आल्या सारखे आहे. त्यामुळे त्यांना प्रीमियम पेमेंट, संपर्क तपशील, क्लेम विषयक माहिती आणि इतर उपलब्ध पर्यायांमध्ये निधी हस्तांतरित करण्याची अनुमती अशा सगळ्या गोष्टी करता येतात. अॅपची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसतानाही ग्राहक माहिती मिळवू शकतात आणि स्वयं-मदत सेवा विनंत्या करू शकतात.”

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने २०१०मध्ये डिजिटलायझेशनचा प्रवास सुरू केला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन द्वारे समर्थित अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यात ते अग्रणी आहेत. डिजिटल तंत्रज्ञान सोल्यूशन्सने कंपनीला एक मजबूत व्यासपीठ विकसित करण्यास सक्षम केले आहे.  कोणत्याही हँड-हेल्ड डिव्हाइसवरून त्यात प्रवेश करता येऊ शकतो. कंपनीचा अंदाजे ९६%  नवीन व्यवसाय आर्थिक वर्ष २०२२ मध्ये डिजिटली लॉग इन केला आहे. तसेच, याच कालावधीत ९२% सेवा या स्वयं-मदत स्वरूपाच्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...