पुणे: आयसीएआय पुणे डब्यूआयसीएएसए(वेस्टर्न इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन) चाप्टर आणि कोलटे पाटील डेव्हलपर्स लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने, बीज रोपण’ मोहीम हाती घेतली घेण्यात आली होती ज्यात आज पुणे, मुंबई आणि लातुर येथील सुमारे 555 सीए विद्यार्थ्यी आणि सदस्यांनी सहभाग घेतला .
ह्या उपक्रमामध्ये एआरएआय, वेताळ टेकडी, आणि भांबुर्डे फॅारेस्ट येथे ९९,९९९ बियानांची लागवड अवघ्या ५ तासात केली गेली.
यावेळी सीए राजेश अग्रवाल (अध्यक्ष पुणे शाखा डब्यूआयसीएएसए, आयसीएआय) यांनी मोहिमेचे नेतृत्व केले ते म्हणाले कि, “आयसीएआयने ही एक चांगली सुरुवात केली आहे आणि पुण्यातील नागरीकांनी या प्रकल्पास दिशा देण्यासाठी मनापासून योगदान दिले आहे हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. या पुढाकाराचा उद्देश आहे जागरूकता वाढविणे. आधुनिक जीवनशैलीच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देत असताना पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण खुप गरजेचे आहे.
या मोहिमेत सर्व वयोगटातील मुला-मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. आयसीएआय पुणे,डब्यूआयसीएएसएला हा दिवस “वर्ल्ड फूड सीड प्लांटेशन डे” म्हणून घोषित करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी अर्ज केला आहे; जेणेकरून अनेक शहरे अश्या उपक्रमासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील.
आजकाल वनक्षेत्र कमी झाल्यामुळे आपण हवामान बदलासारख्या गंभीर पर्यावरणीय प्रश्नांचा सामना करत आहोत. वृक्षारोपण करून मोठ्या प्रमाणावर जागृकता करून या समस्येचा सामना केला जाऊ शकतो.
हा प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, कारण प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे जी जागतिक तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडील अहवालात असे आढळून आले की जगातील बहुतेक प्रदूषित शहरांच्या चार्ट्समध्ये भारतीय शहरे दुसर्या क्रमांकावर आहेत. ह्यामुळे पर्यावरण संरक्षण काळाची सर्वात मोठी गरज आहे.
यावेळी डब्यूआयआरसी अृॅाफ आयसीएआयचे व्हाईस चेअरमन सर्वेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

