को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयसीएआयचे दोन दिवसीय अधिवेशन संप्पन
पुणे: सहकारी संस्थाना प्रभावित करणार्या घटकांशी चर्चा करण्यासाठी आणि को-ऑप सोसायटीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयसीएआय ने महाराष्ट्र को-अॉपरेटीव्ह कन्व्हेन्शन ह्या दोन दिवसिय चर्चासत्राचे नुकतेच आयोजन केले होते.
ह्या कार्यक्रमावेळी पुणे आयसीएआयच्या सचिव सी.ए. रुता चितळे म्हणाल्या कि, विविध विषयांच्या सीए प्रॅक्टीशनर्सना नेटवर्कद्वारे एकत्र आणले आहे आणि ह्या चर्चासत्रासाठी विविध विषयांची निवड करण्यात आली होती. आयुक्त, शुगर महाराष्ट्र स्टेट, पुणेचे संभाजीकडू पाटील यांनी सहकारिता व्यक्त करण्याच्या प्रभावीपणाचा आणि फायद्यांचा उल्लेख केला. सहकारी संस्थांचे संचालन करणार्या विविध घटकांचे त्याने स्पष्टीकरण केले. पुढे त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट्सच्या भूमिकेविषयी आणि सहकारी क्षेत्रांना व्यवहार्य होण्यासाठी कशी मदत करु शकतो याबद्दल सांगितले
या अधिवेशनात आयसीएआयच्या पुणे शाखा डब्ल्यूआयआरसी अॉफ आयसीएआयने कार्यक्रमाचे संंचालन केले व गोवा ब्रांच अॉफ डब्ल्यूआयआरसी अॉफ आयसीएआय आणि पिंपरी चिंचवड ब्रांच अॉफ डब्ल्यूआयआरसी अॉफ आयसीएआए ने ह्यावेळी उपसंचालन केले.