आयबीएस, पुणे द्वारे आंतराष्ट्रीय नोकरीची परंपरा कायम
पुणे, – आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पुण्यातील आयबीएसच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. सन २०१६-१७ मध्ये जवळपास १८ आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
१० जानेवारी, २०१७ पर्यंत ६५ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळाली आहे तर महिना अखेरपर्यंत ८५ टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट करण्याचे ध्येय आहे. यामध्ये बॅंकींग अॅण्ड फायनान्शियल क्षेत्र, आयटी, कंसल्टिंग, सेल्स अॅण्ड मार्केटिंग आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
आयबीएस पुणे संस्थेने दोन वर्षांचा पीजीडीएम हा अभ्यासक्रम तयार केला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना डिझाइन अभ्यासक्रम आणि वितरण, व्यवस्थापन कौशल्य देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात विविध तत्वावर आधारीत प्रात्यक्षिकांवर देखील भर देण्यात येणार आहे. टूल्स, आव्हानांच्या संकल्पना, आणि संस्थांसमोरील सध्याची आव्हाने या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे संपूर्ण कौशल्य देण्यावर भर देण्यासाठी या अभ्यासक्रमाची काळजीपूर्वक रचना करण्यात आली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणासाठी त्याचा फायदा होणार आहे.
कॅम्पसमध्ये मुलाखती आणि जीडीचे (ग्रुप डिस्कशन) आयोजन करण्यात आले होते. या मुलाखती विशेष मंडळातर्फे घेण्यात आल्या. याद्वारे विद्यार्थ्यांमधील गुणांचे मुल्यामापन करण्यात आले. त्यांची निर्णयक्षमता तपासण्यात आली. या प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या आणि मोठ्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थी व्यवस्थापन कौशल्य शिकतील. ज्यामुळे व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य आणि सादरीकरण कौशल्य विकसीत होण्यास मदत होईल.यामध्ये खालील पद्धतीचे साॅफ्ट स्किलचा विकास होईल.
– इंग्रजी भाषा कौशल्य,
– सादरीकरण कौशल्य
– आत्मविश्वास विकास, वैयक्तिक कौशल्य, संघ बांधणी आणि नेतृत्व कौशल्य.