Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय मी ..हार आणि फेटा स्वीकारणार नाही : पंकजा मुंडे

Date:

भगवानगड-तुम मुझको कब तक रोकोगे ची कविता कधी वाचत कधी तुमच्या शिवाय मला आहेच कोण ? असा सवाल करत ,कधी मंत्रीपद किरायाने दिल्याचा आरोप करत , सरकार पडेल ना पडेल यातून बाहेर पद जनते साठी काय केले हे सांगा असा हि सवाल करत ..मराठा आरक्षण जोवर मिळत नाही तोवर हार गळ्यात घालून घेणार नाही ,आणि ओबीसी आरक्षण जोवर मिळत नाही तोवर फेटा घालणार नाही असा शब्द आज पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर खास आपल्या शैलीत जोरदार भाषण केले

दसऱ्याच्या निमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडवर आयोजित मेळाव्याला उपस्थिती लावली. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला. मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते असं म्हटलं. ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले आहात सांगत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मेळाव्याला येण्याआधी पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर उड्डाण केल्यानंतर पुन्हा लँडिंग करण्यात आलं होतं. याबद्दल बोलताना त्यांनी मला वाटलं कोणाची दृष्टी लागली मेळाव्याला असा मिश्किल टोला लगावला. मला वाटलं मी येऊ शकणार नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी पण नंतर मी विचार केला तुम्ही मला कधीपर्यंत रोखणार? म्हणत कविता वाचून दाखवली.

मला काहीजणांनी सत्ता नाही म्हणून मेळावा नको सांगितलं. पण मी नकार दिला. कोणी म्हटलं अतिवृष्टी, करोना आहे. मी म्हटलं अशावेळीच तर लोकांना ऊर्जा देण्यासाठी मेळाव्याची गरज आहे सांगितलं असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“पंकजाताई घरात बसलेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे. लोकांना करोनामध्ये बेड, औषधं मिळत नव्हती. त्यावेळी मी दौरे करायला हवे होते का? तुमची काळजी वाटली म्हणून दौरे नाही केले. पण घऱात बसून नव्हते…कोविड सेंटर सुरु केले होते. घरोघरी आम्ही डबे पोहोचवले,” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

“सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली.

“राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.

“ऊसतोड कामगार मंडळाचं काय झालं असं मला विचारतात. पण मला जसं हवं होतं आणि ज्या वेगाने हवं होतं तसं ऊसतोड कामगार मंडळ झालं नाही हे मान्य करते. पण आज नोंदणी सुरु झाली आहे. त्याची पायाभरणी आपण केली आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आपलं लक्ष लागलं आहे सांगताना जनहितार्थ घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन पक्षांचं सरकार असून एकमेकांना खूश करण्यासाठी जनतेला दुखी केलं जात आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपालाही घऱचा आहेर दिला. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतात. यातून तुम्ही बाहेर पडणार आहात की नाही? जनतेसाठी काय करणार आहात ते सांगा. विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही असं जाीर केलं. याआधी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा नेसणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थितांना व्यसन न कऱण्याचं आवाहन केलं.

चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते
पंकजा मुंडेंनी भगवानगडवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी फुले टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी मी फुले वाहत होते. ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले तुम्ही आले आहात, आभारी आहे. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असे देखील मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडेंनी कविता वाचून दाखवली
पंकजा मुंडे या मेळाव्याला उपस्थिती लावत असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यानंतर हेलिकॉप्टरचे पुन्हा लँडिंग करण्यात आले होते. यानंतर पुन्हा लँडिंग करण्यात आले. याविषयी बोलताना पंकजा मुंडे खोचक टोला लगावत म्हणाल्या की, मला वाटलं कोणाची दृष्टी लागली मेळाव्याला. मला वाटलं मी येऊ शकणार नाही , पण नंतर मी विचार केला तुम्ही मला कधीपर्यंत रोखणार? असे म्हणत पंकजा मुंडेंनी कविता वाचून दाखवली.

“तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाऐं, दिल में अरमान यहीं, कुछ कर जाये… सुरजसा तेज नहीं मुझमें, दीपकसा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझे कैसे टोकोगे, कैसे रोकोगे”

केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही
राज्यातील शेतकऱ्यांचे या पावसाळ्यात प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारच्या पॅकेज जाहीर करण्याविषयी पंकजा म्हणाल्या की, केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये मदत दिली जावी आणि त्यांची दिवाळी गोड करावी. केवळ मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. मात्र राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच त्यांना असे काही बोलले तर राग येतो. आता तुम्हीच सत्तेत आहात आम्ही तुम्हाला विचारणार ना.. तुम्ही विरोधात बसले होता तर धमक्या दिल्या जात होत्या.’ असा टोलाही पंकजा मुंडेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

महिला सुरक्षेवरही केले भाष्य
राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरही देखील पंकजा मुंडेंनी बोट ठेवले आहे. त्या म्हणाल्या की, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला दिसत आहे. महिलांवर अत्याचार होताय, बलात्काराच्या घडना घडत आहे. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले तरीही डोळे काढून घेणाऱ्यांची ही भूमी आहे. अशा लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले गेले पाहिजे. मात्र आपल्या राज्यात काय सुरू आहे? त्यावर बोलायचे नाही, आरोपींवर देखील बोलायचे नाही, सरकारला जाब देखील विचारायचा नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...