Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पेन्शनर्स असोसिएशनच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : खासदार बापट

Date:


पुणे-पेन्शनर्स असोसिएशनच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार बापट यांनी आज येथे स्पष्ट केलं आहे

बापट म्हणाले,’ पुणे शहरात केंद्र शासन आरोग्य योजना (CGHS) बरेच वर्षापासुन सुरु आहे. त्या योजनेचा लाभ केंद्र शासन कर्मचारी व निवृत्त कर्मचारी तसेच त्याचे कुटुंब घेत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यात विविध विषयात पेन्शनर्स असोसिएशन काम करित आहे.
पेन्शनर्स असोसिएशन यांच्या समस्याबाबत माझ्या कसबा ऑफिसमध्ये बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पुण्यातील कॉन्फिडरेशन्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि वर्कर्स पुणे, संरक्षण कर्मचारी संघर्ष समिती, ऑल इंडिया पोस्ट अँड आर.एम. एस. पेन्शनर्स असोसिएशन, द सेंटर सिव्हिलियन पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन खडकी पुणे, डीजीक्यूए इंजीनियरिंग डिसिप्लिन सिविलियन पेन्शनर्स ऑर्गनायझेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्पलोयीज अँड पेनल कॉर्डिनेशन कमिटी पुणे, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) पुणे शहर व जिल्हा, ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन एच.क्यू पुणे, या पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सचिव बैठकीसाठी उपस्थित होते.
पुणे शहरात विविध भागात CGHS मार्फत ९ वेलनेस सेंटर चालू आहेत. त्यामध्ये केंद्रा शासन कर्मचारी व निवृत्त कर्मचारी तसेच त्याचे कुटुंबांना तपासले जाते, तसेच गंभीर आजार असेल तर त्यांचेवर पुणे शहरातील (CGHS) च्या पॅनलमध्ये असलेल्या हॉस्पिटल मार्फत उपचार केले जातात. या हॉस्पिटलचा सर्व खर्च CGHS उचलत आहे. त्यासाठी हॉस्पिटलने कैशलेस फॅसिलिटी दिली होती पण त्यामध्ये हॉस्पिटलची बिले वेळेवर केंद्र शासनाकडून मिळत नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलने पेन्शनर्सना सुविधा देण्यास नकार दिला आहे. तर पेन्शनर्स यांच्याकडे हॉस्पिटल बील भरण्यास मोठी रक्कम नसते. तसेच बहुस्पेशालिटी हॉस्पिटलने अचानक CGHS लाभार्थ्यांना रोखरहित उपचार बंद केले आहेत. धर्मादाय कायद्यांतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलने सर्व व्यक्तींना उपचार दिले पाहिजेत. वैद्यकीय उपचारांचे दर शक्य तितक्या लवकर सुधारणे आवश्यक आहे. सी.जी.एच.एस. ला पुरेसा निधी दिला जावा, जेणेकरून नामांकित रुग्णालयांनी सादर केलेली वैद्यकीय बिले वेळेत मिळतील. पुणे शहरामध्ये एकूण ९ वेलनेस सेंटर दवाखाने असून त्यामध्ये कामावर असणारे व सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी मिळून सुमारे २ लाख कार्डधारक आहेत. शहरात व नवीन भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी / निवृत्ती वेतनधाराकांसाठी त्यांच्या आवाक्यात CGHS नवीन वेलनेस केंद्रे उघडण्याची मोठी मागणी केली आहे. सी.जी.एच.एस. मध्ये औषधोपचार घेणा-या ज्येष्ठ व अतिज्येष्ठ रुग्णांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते. जेष्ठ रुग्णांना काही औषधांची तातडीने गरज असते, ती औषधे स्थानिक बाजारातून खरेदी केली जातात. हि औषधे कमीत कमी दुस-या दिवशी तरी मिळावित हि अपेक्षा आहे. परंतु रुग्णांना दोन-दोन चकरा मारून ही औषधे मिळत नाहीत. सी.जी.एच.एस. मार्फत रोबोटिक व लेजर शस्त्रक्रियांची सोय मिळणेबाबत कारण डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे ज्येष्ठ/ अतिज्येष्ठ रुग्णांना तंदुरुस्त होण्यास वेळ लागतो. मान्यताप्राप्त दवाखान्यात सी.टी. स्कॅन, २ डी इको सोय नसते. पेन्शनर्स त्यांना इतर दवाखान्यात पाठविले जाते. तरी निविदा मंजूर करताना सर्व सुविधा असणा-या अत्याधुनिक दवाखान्यांना मंजुरी द्यावी. पुणे शहरातील सी.जी.एच.एस. मध्ये डॉक्टर व पारा मेडिकल कर्मचारी भरती करणे. सी.जी.एच.एस.चे स्वत:चे आंतररुग्ण हॉस्पिटल स्थापन करणेबाबत हॉस्पिटलला मान्यता मिळावी इत्यादी प्रश्न पेन्शनर्स असोसिएशन यांनी मांडलेले. अशा विविध गोष्टीवर पेन्शनर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाली. असे खासदार बापट यांनी येथे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज घाटात तरुणीने तरुणाला लुटले

पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक...

आता विमान उड्डाणासाठी 15 मिनिटांच्या विलंबाचीही चौकशी होईल:कंपनीला कारण सांगावे लागेल; नियम तत्काळ बदलले

देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रथमच तांत्रिक त्रुटींच्या देखरेखीची संपूर्ण...

वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक रणांगणात… पोलीस बंदोबस्तात ..

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...