आरव पुणे निर्मित युवा संगीतकार निखील महामुनी यांच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन
पुणे : शब्दांमधल्या तरल भावनांची सुरेल पायवाट दाखविणा-या आरव पुणे निर्मित युवा संगीतकार निखील महामुनी यांचा मी गातो माझे गाणे ही दिवाळी पहाट स्वरमैफल पुण्यामध्ये होत आहे. बुधवार, दिनांक २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. सुनील काळे, स्वाती शुक्ल, निशिकांत देशपांडे, डॉ.माधुरी चव्हाण-जोशी, संतोष वाटपाडे, तुषार जोशी, डॉ.अरुणा ढेरे आणि आरती प्रभू अशा नव्या-जुन्या कवी-कवयत्रींच्या दर्जेदार कवितांना निखील महामुनी यांनी आपल्या स्वरसाजाने केवळ नटवलेच नाही तर अधिक बोलते केले आहे. त्यामुळे अनेक नवी गीते या कार्यक्रमात रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
निखील महामुनी हे सादरीकरण करणार असून अमिता घुगरी, ॠचा महामुनी, श्रीया महामुनी यांची सहगायनाची आणि अभय गोखले यांच्या प्रवाही सूत्रसंचालनाची साथ कार्यक्रमाला लाभणार आहे. चांगले काव्य, उत्तम विचार आणि नवनिमीर्तीचा आनंद देणारं संगीत या कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचणार असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘मी गातो माझे गाणे’ : सांगीतिक दिवाळी पहाट बुधवारी
Date: