पुणे-सध्याच्या घडीला सर्वत्र संवादाचा आभाव वाढत आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजातील विविध घटकांशी संवाद साधणं मला आवडतं, असे प्रतिपादन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमत्त आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पुण्यातील ज्येष्ठ नागरिकासाठी काम करणाऱ्या असोसिएशन ऑफ सिनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन ऑफ पुणे (ASCOP) या मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार, हास्ययोग तज्ज्ञ मकरंद टिल्ली यांसह कोथरुडमधील ज्येष्ठ नागरीक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, आजच्या अधुनिक युगात संवादाचा सर्वत्र आभाव दिसतो आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात राजकारणापलिकडे जाऊन समजातील विविध घटकांशी संवाद साधणं, हे मनाला नेहमीच आनंद देणारं आहे. त्यामुळे आज ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून कोथरुडमधील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे. जेणेकरुन त्या अडचणी दूर करता येईल.
ते पुढे म्हणाले की, कोथरुडमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले. लहान मुलांसाठी व्हर्चुअल सर्कस, वाचकांसाठी फिरते पुस्तक घर, असे अनेक उपक्रम राबवित आहोत. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर आपल्या घरी हा उपक्रम देखील सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना घरातच मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

