Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत मी समाधानी – देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भाजपमध्येच अस्वस्थता (व्हिडीओ)

Date:

पुणे : मी फक्त पुण्याच्याच नाही तर सर्वच महापालिकांच्या कामात लक्ष घालतो ,असे विधान करत दादा, भाऊ ,नाना यांच्या स्थानिक नेतृत्वाबाबत साशंकता कायम ठेवीत, पुण्यातील महापालिका पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक आहे असे सांगून भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजच्या महापालिका भेटीत पदाधिकारी बदलाबाबत आशावादी असलेल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या पदरी निराशा टाकली .महापौरांनी बोलाविल्याने मी आलो अशा आजच्या पत्रकार परिषदेतील फडणवीस यांच्या काही वक्तव्यांनी भाजपमधील अनेक नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली होती .

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. ११) पुणे महापालिकेच्या भाजपच्या राजवटीत गेली ४ वर्षे काय केले आणि शेवटच्या वर्षात काय करायचे ,त्यापुढे काय करायचे याबाबतच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. अशा स्वरूपाच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पुणे महापालिकेत आवर्जुन लक्ष घालण्याबाबतच्या या बैठकीला चंद्रकांत पाटलांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता मी सगळ्या राज्यातच लक्ष घालत असतो. सगळ्याच महापालिकांमध्ये जात असतो. पुण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरु केले. त्याचा आढावा घ्यायचा असल्याने महापौरांनी मला पुण्यात आमंत्रित केले. म्हणून मी आलो आहे.असे सांगून भाजपातीलच अनेक नगरसेवकांना धक्का दिला .

आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे शहराचे दौरे वाढवले असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेतल्या जात आहेत. मात्र जुना मित्र असलेल्या शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने भाजप मनसे युती संदर्भात चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आम्हांला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो असे म्हणत युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.पुण्यातल्या नगरसेवकांच्या कामांबाबत समाधानी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. अर्थात प्रोजेक्ट्सनी स्पीड पकडायला हवा हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसेच मी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल समाधानी आहे. कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही, आम्ही स्वबळावर जिंकू असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विविध विकासाच्या प्रकल्पांचा आज पुण्यात आढावा घेतला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निमंत्रणावरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रकल्प सादरीकरण, त्याची सद्यस्थिती, प्रगती आणि पुढच्या काळातील नियोजन याबाबत एक सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या बैठकीबाबत माहिती दिली.

विकास कामांबाबत काय सांगितले फडणवीस यांनी –

24 बाय 7 पाणीपुरवठा योजना ही अतिशय महत्त्वाची योजना. यातून 40 टक्के पाण्याची गळती थांबेल. समन्यायी तत्त्वावर पाणी वाटप होईल. 2018 मध्ये काम सुरू.143 झोन, 35 झोनचे काम यावर्षी शेवटी पूर्ण होईल. 50 झोनचे मार्च 2022 पर्यंत आणि 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.- राज्यात प्रतिमाणशी पाणीवापर पुण्यात सर्वाधिक. पण, गळती असल्यामुळे ते प्रमाण अधिक. वाया गेलेल्या पाण्याचे पैसे सुद्धा जनतेकडूनच घेण्यात येतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.- रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आराखडा चांगला तयार झाला आहे. एसपीव्हीसाठी महापालिकेने एक परवानगी शासनाकडे मागितली आहे. अजून मिळाली नाही. मी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा करेन.मे पर्यंत हे काम सुरू होईल, असे नियोजन महापालिकेने केले आहे.- पुण्याला पर्यावरणपूरक करण्यासाठी मुळा-मुठा प्रकल्प. केंद्र आणि राज्याची परवानगी. यातून 11 एसटीपी तयार होणार. जायकाकडून वित्तपुरवठा.सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया होईल. आधीच्या निविदा चढ्या दराने त्यामुळे त्या रद्द. त्यामुळे नव्याने होतील. केंद्राच्या नव्या निकषात 15 वर्ष देखभाल बंधनकारक. जूनपर्यंत काम सुरू होईल.- घनकचरा व्यवस्थापनाचा निधी आपण पुण्याला दिला. 650 टनपैकी 300 टन कचर्‍यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प पुढच्या 3 महिन्यात आणि नंतर यावर्षीच्या शेवटपर्यंत संपूर्ण 650 टन कचर्‍यावर वीजनिर्मिती. एकूण 1300 टन कचर्‍याची विल्हेवाट आणि प्रक्रियांचेही प्रकल्प.- चांदणी चौक पूल : 135 कोटी जमीन अधिग्रहणासाठी राज्य सरकारने दिले होते. अपवाद म्हणून हा नियम करण्यात आला. अगदी छोटेसे अधिग्रहण राहिले आहे. हे काम सुद्धा वेगाने सुरू होईल.- प्रधानमंत्री आवास योजना : 6000 घरांचे काम सुरू, 19,000 नवीन घरे बांधण्याचे काम यावर्षी अखेर हाती घेण्यात येणार. ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.- पुणे मेट्रो : 22 कि.मीचा पहिला टप्पा यावर्षी सुरू करण्यात येणार, दुसरा 10 कि.मी.चा टप्पा 2022 मध्ये सुरू करण्यात येईल. 60 कि.मी.चा आणखी एक टप्पा मेट्रोत तयार होणार आहे. राज्याने प्रस्ताव केंद्राकडे पाठविला तर पुढच्या बजेटमध्ये येईल, यासाठी प्रयत्न करू.- 150 इलेक्ट्रीक बसेस आल्या आहेत. त्याला पुणेकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. उर्वरित बसेस सुद्धा येत आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत आणखी 500 नवीन बसेस सेवेत येतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.- एचसीएमटीआर : फिजिबिलिटी गॅप देण्याचा निर्णय त्यावेळी राज्य सरकारने घेतला होता. पण, नंतर नवीन सरकार आले. काही भाग पिंपरीमध्ये येत असल्याने त्यांनी नीओ मेट्रोचा प्रस्ताव दिला. हायब्रीड आणि नीओ असा वाहतुकीचा कॉरिडॉर दोन्ही महापालिका मिळून करू शकतात.- एसआरए : जुलै 2019 मध्ये एक अहवाल सादर केला होता. त्यावेळी आचारसंहितेमुळे त्याला अंतिम मान्यता नाही. नवीन सरकार आल्यानंतर दीड वर्षांपासून मान्यता नाही. मी स्वत: नगरविकास मंत्र्यांना भेटून विनंती करणार.- स्मार्ट सिटी : 703 कोटी रूपयांचे 19 प्रकल्प पूर्ण, उर्वरित हाती घेतले आहेत.पुणे मेडिकल कॉलेज : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना नुकतेच आपण भेटलो. मान्यतेच्या दृष्टीने लवकरच पुढाकार घेण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न होणार

ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू , जागतिक चित्रपट स्पर्धेची यादी जाहीर पुणे, दि. १६ डिसेंबर...

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...