मुंबई, 20 फेब्रुवारी, 2022 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 16व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रितिका डावलकर, अव्यक्ता रायावपरू, दिपशिखा विनयामूर्थी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत मुख्य फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत रितिका डावलकरने अव्वल मानांकित अविपशा देहुरीचा 7-6(2), 6-4असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्यक्ता रायावपरूने दुसऱ्या मानांकित स्वरा जावळेचा 6-1, 6-2 असा तर दिपशिखा विनयामूर्थीने चौथ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेत देशभरातून 250 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा व मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंना टेनिसहब आणि इनरझलच्या वतीने आकर्षक पारितोषिके तसेच, एकूण 3लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. माजी एआयटीएचे सहसचिव आणि माजी एमएसएलटीएचे मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन आणि स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या एसओपी अंतर्गत, एमवायएएस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार यांच्या कोविड नियमांचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.
एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांची स्पर्धा संचालक म्हणून तर, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: ध्रुव सेहगल वि.वि.वीरेन चौधरी(14) 3-6, 7-6(2), 6-1;अक्षत दक्षिणदा वि.वि.योना मंदा 6-1, 6-2;
रॉनी विजयकुमार(4)वि.वि.विश्वास चंद्रशेखर 6-0, 6-0;
मनन राय वि.वि.राम मगदूम 6-4, 6-4;
प्रणित पॉल वि.वि.निकुंज खुराणा(7) 3-6, 6-3, 6-0;
दर्श खेडेकर(8) वि.वि.साईराज शेवाळे 7-5, 6-1;
मुली:
रितिका डावलकर वि.वि.अविपशा देहुरी(1) 7-6(2), 6-4;
अव्यक्ता रायावपरू वि.वि.स्वरा जावळे(2) 6-1, 6-2;
श्राव्या नुंबुरी वि.वि.रितसा कोंडकर(16) 6-3, 6-0;
दिपशिखा विनयामूर्थी वि.वि.सृष्टी सूर्यवंशी(4) 6-2, 6-2;
रीतिशा चौधरी(7) वि.वि.अक्षिता अनंतरमन 6-2, 6-3;
एंजल वारंग वि.वि.रिया पुडीयोकडा(13) 6-2, 6-1.
मानांकन यादी खालीलप्रमाणे:मुले: 1.तविश पहावा, 2.फझल अली मीर, 3.कुशाग्र अरोरा, 4.शिवा शर्मा, 5.विराज चौधरी, 6.हित कांदोरिया, 7.दिशेंदर लांबा, 8.यश्वीन दहिया;
मुली: 1.आनंदिता उपाध्याय, 2.अहाना, 3.प्राची मलिक, 4.हविशा चौधरी, 5.सृष्टी किरण, 6.मीराया अगरवाल, 7.नंदिनी कंसाल, 8.अविका.

