ऋषिकेश मोटकर याची दमदार शतकी खेळी; ऋषिकेश व शौनक यांच्यात 192धावांची भागीदारी

Date:

पुणे, 24 फेब्रुवारी 2021: व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दुसऱ्या दिवशी व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने आजदिवस अखेर 8गडी बाद 419धावा करून पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली. 

व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या डावात सिद्धीविनायक क्रिकेट क्लब संघ प्रथम फलंदाजी करताना 78.3षटकात 287धावांवर आटोपला. याच्या उत्तरात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाने दुसऱ्या दिवशी 83षटकात 8बाद 419धावा केल्या. यात ऋषिकेश मोटकर याने अफलातून फलंदाजी करत 176चेंडूत 38चौकार व 1 षटकारासह 189धावांची खेळी केली. ऋषिकेश मोटकरने मयूर खरात(24धावा)च्या साथीत पहिल्या गड्यासाठी 82चेंडूत 87धावांची भागीदारी केली. पण मयूर खरात सारीश देसाईच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर ऋषिकेश याने शौनक त्रिपाठी(73धावा)च्या साथीत 216चेंडूत 192 धावांची भागीदारी करून संघाची बाजू भक्कम करत आघाडी मिळवून दिली. ऋषिकेश रंगतदार खेळ करत असताना कुणाल तांजनेच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारताना संदीप शिंदेने त्याचा झेल पकडून बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या प्रीतेश माधवन 33धावा व कुलदीप यादव 33धावा  यांनी सहाव्या गड्यासाठी 52 चेंडूत 38 धावांची भागीदारी करून संघाला 132 धावांची आघाडी मिळवून दिली. या दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेल बाकी आहे. श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लबकडून सारीश देसाई(116-4), व कुणाल तांजने(101-4)यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक:
दुसरा दिवस: पहिला डाव: श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब: 78.3षटकात सर्वबाद 287धावा वि.व्हिजन क्रिकेट अकादमी: 83षटकात 8बाद 419धावा(मयूर खरात 24(36), ऋषिकेश मोटकर 189(176,38×4,1×6), शौनक त्रिपाठी 73(113,6×4,3×6), प्रीतेश माधवन 33(35,7×4), कुलदीप यादव 33(44,7×4), कुणाल तांजने 23-101-4, सारीश देसाई 30-116-4); पहिल्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाकडे 132 धावांची आघाडी; 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...