एचपी महिला प्रीमियर लीग स्पर्धेत एचपी रॉयल्स संघाचा सलग दुसरा विजय

Date:

पुनीत बालन ग्रुप संघाची विजयी सलामी
पुणे, 24 जानेवारी 2021: हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एचपी रॉयल्स या संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला. 
व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किर्थी(19 धावा व 3-17)हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप संघाने वॉरियर्स स्पोर्ट्स संघाचा 9 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीबी ग्रुप संघाने 20षटकात 6 बाद 114धावा केल्या. यात शिल्पा साहूहिने संयमपूर्ण फलंदाजी करताना 45 चेंडूत 7 चौकरांच्या साहाय्याने 41 धावांची खेळी केली. शिल्पाला किर्थी 19, उत्कर्षा पवार 18 यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. वॉरियर्स स्पोर्ट्सकडून स्नेहल प्रधान(1-19), माया सोनावणे(1-26), संजना वाघमोडे(1-26) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स स्पोर्ट्स संघाला 20षटकात 9 बाद105 धावाच करता आल्या. यामध्ये माया सोनावणे 22, सायली लोणकर 28,, तेजश्री ननावरे 19 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुनीत बालन ग्रुपकडून किर्थी हिने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही चमक दाखवत 17 धावात 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वानंजली मुळ्ये 18धावात 2 गडी, तर आयुशी सोनीने 15 धावात 1 गडी बाद करून किर्थीला साथ दिली. सामन्याची मानकरी किर्थी ठरली.
दुसऱ्या सामन्यात ऋतुजा गिलबिले(52धावा),आदिती गायकवाड(44धावा) व अनुजा पाटील(26 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने आर्या स्पोर्ट्स संघाचा  धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:पुनीत बालन ग्रुप: 20षटकात 6 बाद 114धावा(शिल्पा साहू 41(45, 7×4), किर्थी 19(34,2×4), उत्कर्षा पवार 18(9,3×4), स्नेहल प्रधान 1-19, माया सोनावणे 1-26, संजना वाघमोडे 1-26) वि.वि.वॉरियर्स स्पोर्ट्स: 20षटकात 9 बाद105 धावा(माया सोनावणे 22(28,1×4), सायली लोणकर 28(28,4×4), तेजश्री ननावरे 19(18, 2×4, 1×6), किर्थी 3-17, स्वानंजली मुळ्ये 2-18, आयुशी सोनी 1-15);सामनावीर-किर्थी; पीबी ग्रुप संघ 9 धावांनी विजयी;

एचपी रॉयल्स: 20 षटकात 5बाद 141(आदिती गायकवाड 44(48,6×4), ऋतुजा गिलबिले 52(43,6×4), अनुजा पाटील 26(18,5×4), गौतमी नाईक 1-32, मोना मेश्राम 1-18) वि.वि.आर्या स्पोर्ट्स: 20षटकात 5बाद 99धावा(अंबिका वाटाडे 32(51,4×4), किरण नवगिरे 35(37,4×4,1×6), मोना मेश्राम 13, पूनम खेमनार 2-12, अनुजा पाटील 1-18);सामनावीर-अनुजा पाटील; एचपी रॉयल्स संघ 42धावांनी विजयी. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...