Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“मोदी साहेब जगायचं कसं..?”

Date:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन.

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण पुणे शहरातील आठही विधानसभा क्षेत्रात महागाईच्या विरोधात आंदोलन घेण्यात आले. “बहोत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” अशी धूळफेक करत भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. सत्तेत आल्यानंतर मात्र केवळ धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या सेवेत मोदी सरकार व्यस्त झाले. इकडे प्रचंड महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या या तुघलकी कारभाराचा व वाढलेल्या प्रचंड महागाईचा निषेध करण्यासाठी आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवाजीनगर येथे सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली,तर कॅन्टोमेंटमधील आंदोलनात सिलेंडरला हार घालून त्याची पूजा करण्यात आली.
प्रसंगी आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवाजीनगर, कसबा व कॅन्टोमेंट येथे हजर राहत आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी ” गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत देशाचा कारभार सांभाळताना सर्वसामान्य नागरिकांना उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून याचं कारण म्हणजे दैनदिन गरजेच्या वस्तूंमध्ये झालेली भरमसाठ वाढ अश्या परिस्थिती मध्ये मी देशाच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की ” मोदीजी या महागाईमध्ये सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं..?” असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला.

या आंदोलनात शिवाजीनगर येथे विधानसभा अध्यक्ष उदय महाले,माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके,राजू साने. कसबा येथे माजी शहराध्यक्ष रवींद्रआण्णा माळवदकर, विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे,दिपक पोकळे,निलेश वरे.कॅन्टोमेंट येथे नगरसेवक श्री.प्रदीप गायकवाड,नगरसेवक वनराज आंदेकर विधानसभा अध्यक्ष आनंद सवाने.हडपसर येथे माजी महापौर वैशालीताई बनकर , नगरसेवक योगेश ससाणे,माजी उपमहापौर निलेश मगर,फारुख इनामदार,पूनम पाटील,वैष्णवी सातव विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे,कार्याध्यक्ष संदीप बधे, अमर तुपे. कोथरूड येथे विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, नितीन कळमकर, स्वप्नील दुधाने,मिलिंद वालवडकर,ज्योती सूर्यवंशी, सुष्मा निम्हण,शुभम मातेले.खडकवासला येथे विधानसभा अध्यक्ष श्री.काकासाहेब चव्हाण, कुणाल वेडे पाटील,स्वाती पोकळे. वडगांवशेरी येथे विधानसभा अध्यक्ष नानासाहेब नलावडे,सुहास टिंगरे,महेंद्र पठारे,शैलेश राजगुरू आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...