Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेल्या व्यक्तीला पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा पास कसा मिळतो?; नवाब मलिकांचा सवाल

Date:

मुंबई-

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारच्या काळात राज्यात केलेल्या कामांवर निशाणा साधला. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. फडणवीस बनावट नोटांच्या धंद्याला प्रोत्साहन देत असून त्यांच्या इशाऱ्यावर मुंबईत खंडणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दाऊदचा जवळचा सहकारी रियाझ भाटी याला देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“२९ ऑक्टोबर रोजी रियाज भाटी सहार एअरपोर्टवर खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. ज्याचे संबंध अंडरवर्ल्डसोबत होते. रियाज भाटी वारंवार तुमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही रियाज भाटीने फोटो काढले. असं काय कारण होते की रियाज भाटी पंतप्रधानांतपर्यत पोहोचला. देवेंद्र फडणवीस तुम्ही गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले, बनवाट नोटांचे नेक्सस तुम्ही चालवले. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली केली,” असे मलिक म्हणाले.“एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले?,” असा सवाल नवाब मलिकांनी केला.“८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा देशभरात खोट्या नोट्या पकडल्या जावू लागल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये खोट्या नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला त्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मदत केली. खोट्या नोटांच्या या नेक्सकमध्ये आयएसआय पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्गे संपूर्ण भारतात पसरवल्या जातात. या प्रकरणी मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक झाली. पुण्यात इम्रान आलम शेख याला अटक करण्यात आली. पण या १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही,” असे नवाब मलिक म्हणाले.

“नोटा कुठून आल्या याची चौकशी केली गेली नाही. कारण हे रॅकेट चालवण्याऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते. तो काँग्रेसचा नेता असल्याचा असल्याचे सांगण्यात आले. इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेखला देवेंद्र फडणवीसांनी भाजपामध्ये आणून अल्पसंख्या आयोगाचा अध्यक्ष बनवले होते, असे मलिक यांनी म्हटले.

“रियाझ भाटी फरार आहे. मुन्ना यादववर गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी यासंदर्भात तपास करावा. बनावट नोटांचे प्रकरण महसूल गुप्तचर संचालनालयाकडे आहे. जेव्हा १४ कोटी ५६ लाख पकडले गेले तेव्हा आरोपीला लगेच जामीन मिळाला. ज्याला पकडले होते त्याच्या भावाला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष का बनवले?  हा योगायोग आहे की त्यावेळी या प्रकरणाचा तपास अधिकारी समीर वानखेडे होते. महसूल गुप्तचर संचालनालय हे प्रकरण गेले होते. मुंबईत असलेले समीर वानखेडेंची नियुक्ती या विभागामध्ये १ जुलै २०१७ मध्ये झाली होती. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयने केली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी समीर वानखेडेंची मदत घेतली होती. हाजी अरफातच्या भावाचे प्रकरण मिटवले होते. ज्या अधिकाऱ्याची चौकशी होत आहे त्याच्यावर लक्ष हटवण्यासाठी फडणवीस हे करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे,” असे मलिक म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जागतिक वारसास्थळांवर मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था-प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून राज्यसभेत मुद्दा उपस्थित

विशेष 'हेरिटेज इन्फ्रा पॅकेज'ची मागणी पुणे: महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर,...

काँग्रेसने वंदे मातरम् चे तुकडे केले:जिन्नासमोर नेहरू झुकले..मोदींचा पुनरघोष

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरम्‌ला १५०...

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार पेपर

मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21...