काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा सवाल
मुंबई- तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता आहे. परमबीर सिंह यांना शोधण्यास पोलीसांना यश आलेले नाही,त्यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. परमबीर सिंह हे बेल्जियममध्ये कसे काय पोहचलेत? असा सवाल निरुपम यांनी विचारला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे .
संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंत्र्यावर हप्ता वसुलीचा आरोप केला होता. मात्र ते स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहे. पोलीस म्हणत आहेत के फरार आहे. आता सिंह बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तिथेपर्यंत कोणी पोहोचवले. त्यांना आपण भारतात परत आणू शकत नाही का?’असे ट्विट करत निरुपम यांनी सवाल उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह घरातून फरार असून, पोलीसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस लावून त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तरी देखील परमबीर सिंह हजर न राहिल्याने राज्य सरकारने सिंह यांचा पगार थांबवला आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली आहे.