गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
हिंजवडी : कायस्थ पद्धतीचे जेवण देणारे ‘हॉटेल कायस्थ पंगत’ हिंजवडी येथे पुणेकरांच्या सेवेत रविवार पासून सुरु करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या हस्ते या रेस्टॅारंटचे उद्घाटन करण्यात आले.
सुनील माने, लक्ष्मीकांता माने, निखिल मथुरे, सेलिब्रिटी शेफ यशोधन देशमुख हे या रेस्टॅारंटचे संचालक आहेत.
पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, राष्ट्रवादी कॅांग्रेयचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, शिवाजीनगर मंडल भाजप सरचिटणीस आनंद छाजेड, भाजपा बालेवाडी प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, डॉक्टर असोसियशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, डॉ.अंबरीश दरक, अखिल अग्रवाल, निर्माती-अभिनेत्री पूनम शेंडे, डॅा. प्रीती मुंडे, उद्योजक बनी दालमिया, कॅफे पीटरचे प्रमुख -उद्योजक सचिन साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
रेस्टॅारंट बद्दल अधिक माहिती सांगताना सुनील माने म्हणाले, पुणेकर चोखंदळ आणि चवीचे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुण्याला विविध प्रकारची खाद्य संस्कृती आहे. या खाद्य संस्कृतीत खास कायस्थ पद्धतीचे जेवण देणारे एकही रेस्टॅारंट पुण्यात नव्हते. पुणेकरांची हीच उणीव भरून काढण्यासाठी यशोधन देशमुख यांच्या खास कायस्थ मेनू ने सजलेले ‘कायस्थ पंगत’ हे रेस्टॅारंट द सोशल स्ट्रीट हिंजवडी येथे सुरू करण्यात आले आहे. लवकरच पुणे शहरातही ‘हॉटेल कायस्थ पंगत’ सुरु होणार आहे.
कायस्थ खाद्यसंस्कृती जशी विविध पदार्थाने समृद्ध आहे तशीच ती तेवढीच समावेशक ही आहे. अनेक वर्षाच्या ऐतीहासिक नोंदी आणि संशोधन करून शेफ यशोधन देशमुख यांनी हा कायस्थ खाद्यसंस्कृतीचा ठेवा खास पुणेकरांच्या सेवेत आणला आहे. वैशिष्ठ म्हणजे आजही इथे पारंपरिक पद्धतीने आणि स्थानिक पदार्थांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये टोमॅटो आणि बटाट्याचा वापर केला जात नाही . कायस्थ खाद्यसंस्कृती हि हजारो वर्षाची परंपरा लाभलेली खाद्यसंस्कृती आहे आणि आज एका नवीन स्वरूपात मूळ चवीत आणण्याचा प्रयत्न शेफ यशोधन देशमुख यांनी केला आहे, असे निखील मथुरे यांनी सांगितले.
कायस्थ खाद्यसंस्कृती प्रामुख्याने मासे ,मटण तसेच अनेक शाकाहारी रुचकर आणि स्वादिष्ठ पदार्थाने सजलेली आहे. चवीने खाण्यासाठी आणि तितक्याच आपुलकीने खाऊ घालण्यासाठी कायस्थ समाज ओळखला जातो. पदार्थ जरी सारखे असले तरीही ते बनवण्याची वेगळी पद्धत आणि त्यात टाकले जाणारे घटक या जेवणाला वेगेळेपण प्राप्त करून देतात. वालाचं बिरडं किंवा बोंबलाचं भुजणं,भरला बोंबील , खिम्याचे कानवले किंवा निनाव, वडीचे सांबार,भरली वांगी, सोडे भरली वांगी, तेलपोळी हे काही कायस्थ पद्धतीचे प्रमुख खाद्यपदार्थ सांगता येतील. आमचा हा नवीन प्रयोग नक्कीच पुणेकरांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.असे माने म्हणाले.