आमदार निधीतून रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन केंद्र उभारणार

Date:

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्य.
  • ससून मध्ये बेड वाढविण्याची चर्चा सुरु ,निर्णय नाही

पुणे- राज्यातील कोरोनाचे वाढते संकट ध्यानात घेता आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्यालयांना मदत म्हणून मंजूर करावेत व प्राधान्याने प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली व ती उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पाटील यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली की, राज्य सरकारने आमदारांना विकासनिधी वाढवून दिला आहे. त्यापैकी काही निधी थेट कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरणे व त्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना मदत करण्याची गरज आहे.

आमदार निधीतील दोन कोटी रुपये कोरोना प्रतिबंधासाठी उपलब्ध करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली. त्यापैकी एक कोटी रुपये निधीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मान्यता दिली व ऊर्वरित एक कोटी रुपयांबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

अजित पवार यांच्याशी चर्चा करताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याने सर्वत्र समस्या निर्माण झाली आहे. हे ध्यानात घेता सर्व मोठ्या रुग्णालयांचे स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती केंद्र असणे व त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यबाबत स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. आमदार निधीचा वापर या कामासाठी करण्यात यावा.

चंद्रकांत पाटील यांनी रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला. या इंजेक्शनची खरेदी तसेच रुग्णांना ती देणे ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होण्याची गरज आहे. रुग्णांना उपचार मिळण्याबरोबरच विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...