पुणे-
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी लिगल सेलच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ‘‘जागतिक महिला दिना’’ निमित्त महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी दाखविलेली आहे. वकिलीमध्ये सुध्दा अनेक नामवंत महिला वकिलांनी युक्तीवाद करून आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच अनेक महिला वकिलांनी न्याय क्षेत्रात खूप मोठे काम केलेले आहे.’’यानंतर पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुजा आनंद म्हणाल्या की, ‘‘महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त महिला वकीलांनी न्याय मिळवून देण्याचे काम करणे गरजेचे आहे.’’कार्यक्रमाचे संयोजन ॲड. अश्विनी गवारे, ॲड. पुजा भोसले यांनी केले. या प्रसंगी उपस्थित सर्व महिला ॲड. विशाखा गाडेकर, ॲड. संघमित्रा गायकवाड, ॲड. सुवर्णा आढाव, ॲड. रेश्मा शिकलकर, ॲड. रेश्मा जगताप, ॲड. अनुपमा गायकवाड इत्यादी महिला वकिलांचा प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुणे जिल्हा लिगल सेल उपाध्यक्ष ॲड. श्रीनिवास खुंटे, पुणे शहर जिल्हा लिगल सेल प्रभारी ॲड. राहुल ढाले, महाराष्ट्र प्रदेश लिगल सेल वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. अनिल कांकरिया यावेळी उपस्थित होते.

