- गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त २३ महिला पोलिसांना ‘कोरोनमुक्त गुढी’ देऊन मानवंदना
पुणे : पोलीस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या २३ महिला पोलीसांना कोरोनमुक्त गुढी देऊन ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ पुणे शहरच्या वतीने सन्मान करण्यात आला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावणाऱ्या महाराष्ट्रातील महिला पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा सन्मान करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कोथरूड शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. कोरोनमुक्त गुढी आणि सन्मानपत्र आहे सन्मानाचे स्वरूप होते.
‘कोरोनासाठी लढताना महिला पोलीसांचे आणि नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. अशा प्रकारच्या सन्मानाने लॉकडाऊन काळात महिला पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या एकजुटी सहकार्यामुळे कोथरूडमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास आम्हाला यश मिळत आहे’, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी दिली.
कधी सावित्री, जिजाऊ, अहिल्या, रमाई अशा विविध रूपात ‘कोविड वुमन वॉरियर’ बनून महिला पोलीस सतत कार्यरत असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता सतत समाजहितासाठी कामगिरी करत असतात. कोरोना काळात मोलाचा वाटा उचलणारे पोलीस पांडू नाही तर पांडुरंग आहेत, विटेवर नाही तर वाटेवर समाज रक्षणासाठी उभे आहेत अशा पोलिसांना मनाचा मुजरा, असे मत गिरीश गुरनानी यांनी व्यक्त केले.
अमोल गायकवाड (उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस), आकाश नागरे (सरचिटणीस, कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस), रवि गाडे (उपाध्यक्ष, कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ), सौरभ ससाणे (उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांचे सहकार्य लाभले

