पूना गेस्ट हाऊस व गणपती चौक दुकानदार व्यापारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मराठी नविन वर्षानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
पुणेः पूना गेस्ट हाऊसच्या वतीने मराठी नविन वर्षानिमित्त शंभरहून अधिकवेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. वयाची साठ वर्षे ओलांडल्यानंतरही समाजाविषयी बांधिलकी जपणाऱ्या या रक्तदात्यांवर उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला. पूना गेस्ट हाऊस व गणपती चौक दुकानदार व्यापारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रोड येथील पूना गेस्ट हाऊसमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रवीण परदेशी, संजीव मुनोत, प्राजक्ता कोळपकर, महेश सूर्यवंशी, आनंद सराफ, दिलीप राऊत, अनिल पेंडसे, सतिष मराठे, दीपक कुलकर्णी इचलकरंजी व संतोष चोरडिया यांची उपस्थिती होती. शिबीराचे संयोजन किशोर सरपोतदार व अजित कुमठेकर यांनी केले.
यावेळी दत्तात्रय मेहेंदळे, रवींद्र ओक, प्रदीप कपीले, सारंग यादवाडकर, मुक्ता पुरंदरे, संतोष ताम्हणकर व वर्षा ताम्हणकर यांचा सन्मान करण्यात आला. पुणेरी पगडी, मोत्यांची माळ, चाफ्याच्या फुलांची परडी व मिठाई देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. शिबीरात सकाळी दहा ते दुपारी पाच यावेळात ८० हून अधिकजणांनी सहभाग नोंदविला. शिबीरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास सोन रुपम ज्वेलर्सच्यावतीने एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड सोनसाखळी भेट देण्यात आली. किशोर सरपोतदार व संजीव मुनोत यांनी स्वागत केले व अजित कुमठेकर यांनी आभार मानले.

