कंपनीचे दावे —
भारतातील सर्वात प्रॅक्टिकल स्कूटर
ब्लॉक पॅटर्न टायर्स – खराब रस्त्यांवरही जास्त पकड देणारी उद्योगक्षेत्रातील पहिली
गाडी
जास्तीत जास्त वापर – अधिकची लेगरूम, फ्लॅट फूटबोर्ड आणि सीटखालील
दिलेल्या जास्त जागेमुळे सामान वाहून नेण्याची अधिक क्षमता
होंडाची विश्वासार्हता आणि भरवसा
110 सीसी होंडा हेट इंजिन
सुपर मायलेज
उत्साहवर्धक पिकअपसह सर्वोत्तम ऊर्जा आणि वजनाचे प्रमाण (पॉवर टू वेट रेशो)
होंडाच्या इक्विलायझरसह कॉम्बिब्रेक सिस्टम तंत्रज्ञानामुळे (सीबीएस) अधिक
सुलभ प्रवास
सुलभतेसह अधिक चांगला आऱामदायीपणा
स्त्री आणि पुरुष अशा दोहोंनाही आरामदायी वाटेल असे युनिसेक्स डिझाइन
कमीत कमी किंमतीत मालकी आणि स्मूथ राइडसाठी ऑटोमेटिक ट्रान्समिशन
वापरायला सोपी : कमी उंचीची परंतु आकाराने मोठी सीट, कमी वजनाची गाडी
4 रंगांत, 43,076 रुपयांना (एक्सशोरूम, पुणे) उपलब्ध
पुणे : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेड (एचएमएसआय) हा
महाराष्ट्रातील दुचाकीच्या विक्रीतील क्रमांक एकचा ब्रँड आहे. या ब्रँडतर्फे क्लिक – या 110
सीसी स्कूटरचे आज उद्घाटन करण्यात आले. ही गाडी म्हणजे जास्तीत जास्त
आरामदायीपणा, सुलभता आणि अतिरिक्त मूल्य देणारे एक उत्पादन आहे. होंडा टूव्हीलर्स
इंडियाची ही नवी क्रांतिकारी क्लिक स्कूटर म्हणजे स्कूटरायझेशन क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे
नेणारे मोठे पाऊल आहे. महाराष्ट्र राज्य भारतातील स्कूटरची सर्वात मोठी बाजारपेठ असून
स्कूटरची मागणी आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही विस्तारत आहे.
होंडा टूव्हीलर्स इंडियाचा विस्तार करताना, महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये अग्रणी स्थान
मिळवत (भारतातील सर्वात मोठ्या स्कूटरची बाजारपेठ), ही गाडी आता मुख्य शहरांच्या
पलिकडे जाऊन पोचली आहे, असे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिच्या विक्री
आणि वितरण विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले.
“महाराष्ट्रात दुचाकी बाजारपेठेत ४०% पेक्षा जास्त प्रमाणात स्कूटर प्रकारातील दुचाकींची
विक्री होते. या राज्यात स्कूटरायझेशन सर्वात आधी स्वीकारण्यात आले असून येथील
ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या गरजाही वाढत आहेत. त्यामुळेच स्कूटर हा दुचाकींचा
प्रकार आता एका उप बाजारपेठेसाठी तयार आहे. होंडाने स्कूटरायझेशनमधील देशातील अग्रणी
स्थान कायम ठेवले आहे आणि आमच्या नव्या क्लिकच्या उद्घाटनाने स्कूटरायझेशनमध्ये
पुढचे पाऊल टाकले आहे. क्लिक ही देशातील पुरोगामी विचारांच्या ग्राहकांसाठी विकसित
करण्यात आलेली एक दुचाकी असून ती 100-110 सीसीच्या प्रकारातील खरी दावेदार आहे.
क्लिक पारंपरिक उत्पादनांना छेद देत आपल्या व्यवहारीकतेचा उत्कृष्ट मेळ साधत विविधता
आणि पैशांच्या दृष्टीकोनातून योग्य असा न्याय देते. दुचाकी बाजारपेठेतील आपल्या
अतुलनिय अर्थव्यवस्थेमुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मास मोटरसायकल यांच्यातील
किंमतीचे अंतर आता होंडाने मोडून काढले आहे. आम्हाला खात्री आहे की क्लिक ही दैनंदिन
प्रवासासाठीचा नवा पर्याय असेल.’’
`क्लिक’ व्यवहारीकतेसह जास्तीत जास्त सुविधा देते
उद्योगातील ओईएम फिटमेंटच्या निकषांवर आधारित 100-110 सीसी दुचाकी प्रकारातील
क्लिकला चाकांचा विशेष ब्लॉक पॅटर्न आहे. यामुळे ही दुचाकी सखोल ग्रूव्हजसह खराब
रस्त्यांवरही कुठल्याही हवामानात जास्त पकड आणि अधिक चांगले नियंत्रण देते. याचे टायर
अधिक टिकाऊ असून त्यांचे आयुष्यही जास्त असते.
विस्तारीत फूटबोर्ड, सीटखालील स्टोरेजसाठी देण्यात अधिक आलेली जागा आणि रेअर कॅरिअर
(ऐच्छिक) यामुळे आरामदायीपणात वाढ होतेच, शिवाय वजन वाहून नेण्याची क्षमताही वाढते.
क्लिक विश्वासार्ह अशा 110 सीसी होंडा बीएस-IV हेट (होंडा इको टेक्नॉलॉजी) इंजिनद्वारे
तयार करण्यात आली आहे. यामुळे गाडीचा मायलेज अत्यंत चांगला मिळतो आणि तिच्या
कामगिरीत कुठलीही तडजोड केली जात नाही. गाडीचे इंजिन 5.91 केडब्ल्यूचे आहे आणि
याचे कर्ब वेट केवळ 102 किलो आहे, वजनाच्या तुलनेत हे सर्वोत्तम प्रमाण असून, यामुळे
गाडी चालवण्याचा उत्साह द्विगुणित होतो.
काळाच्या पुढे धावणाऱ्या क्लिकमध्ये कॉम्बि ब्रेक सिस्टम (सीबीएस) इक्विलायझर
तंत्रज्ञानासह येते. (सरकारच्या नियमांनुसार, सीबीएस सर्व प्रकारच्या 125 सीसी इंजिनच्या
दुचाकींसाठी 1 एप्रिल 2018 पासून सक्तीचे करण्यात आले आहे.) होंडाच्या अत्याधुनिक कॉम्बि
ब्रेक सिस्टम (सीबीएस) चे हे अनोखे इक्विलायझर ब्रेकला दिलेला दाब हा फ्रंट आणि रेअर
चाकांमध्ये विभाजते. ही कृती केवळ डावीकडचा ब्रेक दाबल्यावर होते. यामुळे जलद गतीने
अंतर कापता येते, शिवाय बॅलन्सही साधता येतो. आपला गाडीवरील प्रवास अधिक चांगला
होण्यासाठी ब्रेक यंत्रणा सुलभ असणे अत्यंत गरजेचे आहे.
सुलभतेसह अधिक चांगला आरामदायीपणा
क्लिकचे युनिसेक्स डिझाइन स्त्री आणि पुरुष अशा दोहोंसाठी समान आरामदायी आहे. अधिक
सुलभ प्रकारातील असलेला क्लच आणि एंगेजिंग गिअरमुळे आणि क्लिकच्या ऑटोमेटिक
ट्रान्समेशन ही दुचाकी कमीत कमी किमतीत स्मूथ राइडची खात्री देते. कमी उंचीवरील सीट
आणि वजनाला हलकी असलेली क्लिक वाहतूक कोंडी तसेच रूंद गल्ल्यांमधूनही सहजी वाट काढू
शकते.
मोबाइल चार्जिंग सॉकेटमुळे तुम्हाला कायम कनेक्टेड राहण्याची खात्री मिळते. तसेच ट्यूबलेस
टायर, फार देखभाल न करावी लागणारी बॅटरी आणि घट्ट चिवट अशा एअर फिल्टर यामुळे
दुचाकीस्वाराचा प्रवास अधिक सुलभ होतो.
ऑप्शनल अॅक्सेसरीज
ग्राहक फ्रंट स्क्रीन, फ्लोअर कव्हर, बॉक्स सेंटर, कॅप कव्हर आणि रेअर ग्रीप यामधून विविध
पर्यायी भाग निवडू शकतात, यामुळे सुविधेचा विस्तार तर होतोच आणि क्लिकच्या सौंदर्यातही
भर पडते. हे पार्ट ग्राहकांकडून वैयक्तिकरीत्या निवडले जाऊ शकतात आणि आर्थिकदृष्ट्या ते
योग्य किंमतीत पुरवले जातात.
रंग, प्रकार आणि उपलब्धता
होंडाच्या नेहमीच्या अत्याधुनिक प्रकारांना फाटा देणाऱ्या क्लिक या गाडीचे उत्पादन
राजस्थानातील होंडाच्या दुसऱ्या प्लांटमध्ये केले जाते. जूनमध्ये राजस्थानात कामाला सुरुवात
केल्यावर, क्लिक आता महाराष्ट्रभर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी क्लिक चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे : पॅट्रिओटिक रेड विथ व्हाइट, ब्लॅक,
मोरोक्कन ब्लू विथ व्हाइट आणि ओरकस ग्रे या रंगात गाडी उपलब्ध असून, स्टँडर्ड आणि
ग्राफिक प्रकारात 43,076 रुपये (एक्स शोरूम, पुणे) इतक्या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील होंडाबद्दल :
महाराष्ट्र ही भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी दुचाकी बाजारपेठ आहे, आणि
आकाराने क्रमांक एकवरील स्कूटरची बाजारपेठ आहे. होंडा टूव्हीलर इंडिया हा महाराष्ट्रातील
निर्विवाद क्रमांक एकचा विक्री करणारा ब्रँड आहे, बाजारपेठेतील तब्बल 46 टक्के वाटा या
ब्रँडचा आहे.
अधिक चांगल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा आणि कामाच्या ठिकाणी अधिक महिलांचा
समावेश यासह मायलेज आणि किंमतीच्या मानाने सुधारणा होऊन 110 सीसीच्या मोटसायकल
सुलभ उपलब्ध व्हाव्यात आणि त्या युनिसेक्स ऑटोमेटिक स्कूटर असाव्यात या भारतीय
राइडर्सच्या प्राथमिक गरजा आहेत. आजच्या घडीला साधारणपणे 45टक्के सर्व दुचाकी
महाराष्ट्रात विकल्या जातात. हा आकडा आर्थिक वर्ष 2017-18च्या पहिल्या तिमाहीत संपूर्ण
भारतातील 33 टक्के सरासरीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. स्कूटर प्रकारात होंडा
बाजारपेठेतील सगळ्यात जास्त म्हणजेच 63 टक्के भागांसह अग्रणी स्थानावर आहे.