नवी दिल्ली, १४ जुलै, २०२२: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) केंड्रिल (NYSE: KD) या जगातील सर्वात मोठ्या आयटी पायाभूत सुविधा पुरवठादार कंपनीशी भागिदारी केल्याचे नुकतेच जाहीर केले. या भागिदारीअंतर्गत एचएमएसआयच्या सर्व उत्पादन कारखान्यांमध्ये आयटी व सुरक्षा स्थित्यंतरात आणखी सुधारणा घडवून आणली जाणार आहे.
सध्या केंड्रिलद्वारे प्लँट उत्पादन वापर, व्यवसाय आणि वितरक व्यवस्थापन यंत्रणेचे सर्व वितरकांसाठी व्यवस्थापन केले जाते.
कार्यक्षम, वेगवान आणि सुधारित ग्राहकानुभवाचा समावेश करत कंपनीने केंड्रिलसह नव्याने प्रस्थापित केलेली भागिदारी पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन आणि अपटाइम स्वयंचलनाच्या मदतीने वाढवणार आहे. त्याचबरोबर कंपनीची सायबरसुरक्षा उंचावण्यात येईल.
एचएमएसआयचा व्यावसायिक वापर आणि आयटी यंत्रणांची उपलब्धता उंचावण्यासाठी ही नवी भागिदारी ऑन- डिमांड डिझास्टर रिकव्हरी अॅज अ सर्व्हिस (डीआरएएएस) स्थापन करणार आहे. त्यामुळे एचएमएसआयच्या प्रायमरी डेटा सेंटरवर परिणाम घडवून आणू शकणाऱ्या संकटादरम्यान कमीत कमी तूट आणि उत्पादनातील नुकसान कमी होईल.
याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘केंड्रिल इंडियाबरोबरची भागिदारी जाहीर करताना एचएमएसआयला आनंद होत आहे. गुंतागुंतीच्या आयटी यंत्रणेवर आधारित एचएमएसआयच्या व्यवसायाच्या त्यांना असलेल्या सखोल ज्ञानामुळे भारतातील कामकाजासाठी ते विश्वासू भागीदार आहेत. भविष्यात नव्या धोरणाचा आम्हाला व्यवसायाची उपलब्धी आणि कामकाजाचा अंदाज वाढवण्यासाठी तसेच ग्राहक व भागीदारांना चांगली सेवा देता यावी म्हणून अधिक वेगवान आयटी सेवा अमलात आणण्यासाठी मदत होईल.’
या भागिदारीविषयी केंड्रिल इंडियाचे अध्यक्ष श्री. लिंगराजू सावकार म्हणाले, ‘सतत विस्तारत असलेल्या स्पर्धात्मक यंत्रणेत इतरांपेक्षा पुढे राहाणे आणि व्यावसायिक तसेच कार्यालयीन आव्हाने ओळखणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा
क्षेत्रात केंड्रिलने सिद्ध केलेली गुणवत्ता, स्वयंचलन आणि क्लाउड ट्रान्सफॉर्मेशन, त्याला देण्यात आलेली एचएमएसआयच्या महत्त्वाच्या कामकाजाविषयी असलेल्या ज्ञानाची जोड यामुळे भविष्यात वेगवान व लवचिक आराखडा तयार करणे शक्य होणार आहे. एचएमएसआयबरोबर करण्यात आलेल्या भागिदारीमुळे आम्हाला आनंद झाला असून त्यांच्या भारतातील कामकाजाचे खऱ्या अर्थाने डिजिटल स्थित्यंतर करणे शक्य होईल.’
संकटप्रसंगी केंड्रिलचे क्लाउड रेझिलियन्सी ऑर्केस्ट्रेशन टुल एचएमएसआयचे प्रायमरी डेटा सेंटर काही सेकंदांत परत पूर्णपणे कार्यान्वित करू शकते आणि याचे रेझिलियन्सी आर्किटेक्चर वाढत्या ग्राहक मागणीच्या काळात सेसमिक झोनमध्ये जाऊन यंत्रणा आणखी लवचिक करेल.
त्याशिवाय केंड्रिल, आयटी विस्तारासह येऊ शकणाऱ्या पालन आणि प्रक्रियेविषयीच्या आव्हानांसाठी एचएमएसआयचे वितरण आणि आयटी फ्रेमवर्क स्वयंचलित करेल. या एकत्रीकरणामुळे आयटी पायाभूत यंत्रणेवर देखरेख करण्यासाठी तसेच पॅचिंग, बॅक अप स्टेटस आणि प्रोव्हिजनिंग अशा तपासण्यांसाठी एकच ऑटोमेटेड एक्झक्युटिव्ह डॅशबोर्ड तयार केला जाईल.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाविषयी
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ही होंडा मोटर कंपनी, जपानच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. २००१ मध्ये स्थापना झाल्यापासून एचएमएसआय वेगाने विस्तार करत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दुचाकी कंपनी असून त्यांचे जगभरात ५० दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. एचएमएसआयचे मानेसर (हरियाणा), तापुकारा (राजस्थान), नरसापूर (कर्नाटक) आणि विठलपूर (गुजरात) अशा चार ठिकाणी उत्पादन कारखाने आहेत. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी होंडाने ६००० टचपॉइंट्स आणि २८० पेक्षा जास्त बेस्ट डील आउटलेट्स (२०० शहरांत) स्थापन केले असून त्यामुळे प्री- ओन्ड होंडा दुचाकींसाठी एकाच छताखाली सर्व सेवा मिळतात. अधिक माहितीसाठी भेट द्या https://www.honda2wheelersindia.com/

