Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महासाथीतील घरे व कार्यालये – किती बदलले आहे? – अनिल फरांदे, अध्यक्ष – फरांदे स्पेसेस

Date:


कोव्हीड १९ महासाथीने भारतीयांच्या जीवनात अनेक बदल घडवून आणले हे किमानपक्षी सर्वांना मान्य व्हावे. टाळेबंदी ही भीतीदायक होती व  तिने आपल्या घर आणि कार्यालयाकडे नव्याने बघायला आपल्याला शिकविले.  . 

एकदा भीतीने ताबा घेतल्यावर बाधा होण्याची भीती हा कोणत्याही कारणासाठी परावर्तक ठरला आहे. कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय देऊ करावा लागला आणि भारतीयांनी त्याची सवय करून घ्यायला काहीसा वेळ लावला.  .

परंतु या ८ -१० महिन्यांच्या कालावधीत घरून काम करण्याचा पर्याय अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरत असल्याचा आश्चर्यकारक अनुभव भारतातील कंपन्यांना आला. महासाथीचा तीव्र टप्पा सुमारे १८ महिने लांबला आणि सवयी व दृष्टीकोनात सखोल बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा दीर्घ होता. अनेक भारतीयांना घरून काम करण्याची सवय झाली आणि तेच त्यांना बरे वाटू लागले.  .

A picture containing floor, indoor, ceiling, building

Description automatically generated


आणि आता पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची वेळ येऊन ठेपली असताना काहीसा विरोध असणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत घर आणि कामाच्या जागेशी असलेल्या भारतीय लोकांच्या नात्यात कमालीचा फरक पडला आहे. आता अनेक कर्मचारी घरून काम करण्यास प्राधान्य देतील. एक तडजोड म्हणून कंपन्यांनी कामाची मिश्र पद्धती – म्हणजेच अंशतः घरून व अंशतः कार्यालयात येऊन काम करण्याच्या पद्धती अवलंबिण्यास सुरवात केली आहे.    

गेल्या दोन वर्षातील हा अतिशय महत्वाचा व मोठा बदल झालेला आहे. महासाथीचे आगमन होईपर्यंत भारतीय आपले घर व कार्यालय या दोन्ही वेगवेगळ्या जागा असल्याचे गृहीत धरून जगत होते आणि प्रत्येक ठिकाणची कामे व फायदे वेगवेगळे आहेत असाच दृष्टीकोन होता. परंतु तेच भारतीय कार्यालयाचे घरून काम करण्याची जीवनशैली इतक्या झटपट स्वीकारतील असा अंदाज सुद्धा कोणी केला नसेल.   .

घरांनी कार्यालयांची जागा घेतली आहे काय?

सल्लागार व मुक्तपणे काम करणारे सोडले, तर कोव्हीड १९ महासाथीपूर्वी बहुतांशी भारतीय कार्यालयात काम करण्यास प्राधान्य देत असत . यासाठी काही कारणे होती  . 

कंपन्यांची कार्यालये ही सामाजिकदृष्ट्या दुमदुमणारी , स्वच्छ, सुनियोजित व आपल्यासाठी आवश्यक अशा प्रत्येक बाबतीत सुसज्ज असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीयांकडे कार्यालयातील काम घरून करण्यासाठी योग्य पद्धतीची उपकरणे उपलब्ध नव्हती. तसेच घरामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असल्यामुळे कार्यालयाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते.  .

उत्पादकता व प्रेरणा कायम ठेवण्यात कार्यालयांनी नेहमीच महत्वाची भुमिका बजावली आहे. पण गेल्या दोन वर्षात जगभरात लोकांनी आपली घरे ही कार्यालये म्हणून सुद्धा वापरता येतील असे बदल करून घेतले. ज्या सुदैवी लोकांकडे घरातच कार्यालय सुरु करण्यासाठी पुरेशी जागा होती, त्यांना फक्त एखादा लॅपटॉप व इंटरनेट जोडणी व घराच्या अंतरंगात व स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीत केलेले बदल पुरेसे होते.    .

कर्मचारी घरूनच काम करतात याबाबत कंपन्याच समाधानी असल्याची बाब नक्कीच समाधानकारक आहे . पण गेल्या १८ महिन्यात आपणच आपल्यात अमुलाग्र बदल केले आहेत.   

ऑनलाईन खरेदी ते झूम व टीमच्या माध्यमातून शाळा ते डॉक्टरांशी दृक्श्राव्य सल्लामसलतीच्या बाबतीत शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात प्रवास न करता काम आणि व्यक्तिगत जीवनाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य भारतीयांनी आत्मसात केले.      

आता घरे इतकी महत्वाची झाली आहेत की महासाथीच्या ऐन भराच्या कालावधीत सुद्धा घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत. आपल्या मालकीची व नियंत्रणाखालील जागा असण्याबाबत भारतीयामध्ये जशी अधिकाधिक जागरूकता निर्माण होत गेली, तशी घरांची मागणी वाढत गेली. आपले घर आपण खरेदी केले पाहिजे ही भावना पहिली साथ संपण्यापूर्वी जोर धरत होती आणि तेव्हापासून ती जोरात आहे.   .  

कोव्हीडच्या पहिल्या साथीत जसजशी कार्यालये बंद होत गेली आणि लोक आपापल्या मूळ गावी परतले, तसे भाड्याचे दर सुरवातीला कमी झाले, परंतु आता आणि विशेषतः आमचे अनेक कर्मचारी आता आठवड्यातील काही दिवस कार्यालयातून काम करणे अपेक्षित असल्याचे मोठ्या कंपन्यांनी घोषित केल्यावर आजघडीला घरांच्या भाड्याचे दर करोना महासाथीच्या पूर्वस्थितीला आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदर पुन्हा एकदा घरांमध्ये गुंतवणूक करण्याचा व त्यापासून उत्पन्न मिळविण्याचा विचार करू लागले आहेत. 

बदल – तात्पुरते की कायमस्वरूपी?

पेपर जायंट या ऑस्ट्रेलिया स्थित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, कोव्हीड महासाथीच्या कालावधीत जेव्हा लासी उपलब्ध नव्हत्या, तेव्हा सुमारे ८३ % भारतीय कर्मचारी काम करण्यासाठी कार्यालयात जाण्यास फारसे उत्सुक नव्हते. परंतु लिंक्डइन द्वारे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात ७२ % भारतीय आता काम करण्यासाठी कार्यालयात जाण्यास उत्सुक असल्याचे आढळून आले आहे.   

इस्पोस ही बाजारपेठेचे व सार्वजनिक अभिप्रायांचे बाबत संशोधन करणारी संस्था व जागतिक आर्थिक मंच यांच्या ऑगस्ट २०२१ मधील एका अहवालानुसार या स्थितीत आठवड्याला ३.४ दिवस घरून करावे लागेल अशी भारतीयांची अपेक्षा आहे.   

अनेक बदल घडले आहेत आणि घडत राहतील. काही बदल तात्पुरते तर काही बहुधा कायमस्वरूपी असतात.  . 

उदाहरणार्थ छोट्या घरांचे पूर्वी असलेले आकर्षण आता कमी होईल. घरातच कार्यालय व इ स्कूलिंगची सुविधा देता येईल अशा मोठ्या घरांची खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल राहिल. विकासक सुद्धा १.५, २.५, ३.५ बीएचके स्वरुपाची घरे ग्राहकांना देऊ करीत आहेत. 

यापुढे घर खरेदी करण्याचे सर्व पर्याय हे घर व कार्यालय एकाच ठिकाणी आवश्यक व बहुविध सुविधा देऊ करणारे असतील. 

लेखकाविषयी:

A person with a mustache

Description automatically generated with low confidence

श्री  अनिल फरांदे हे   पुण्याच्या    पश्चिम भागातील   नगर वसाहतीच्या क्षेत्रातील  अघाडीची व आयएसओ ९००१ प्रमाणित फरांदे स्पेसेस या मुख्य कंपनीच्या फरांदे प्रमोटर्स & बिल्डर्स  कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून क्रेडाई (पुणे मेट्रो) चे अध्यक्ष आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...