गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते डिंभे धरण उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचा शुभारंभ

Date:

पुणे दि 9: पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचा शुभारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला.

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याकडील 5 ते 25 मधील उर्वरीत अस्तरी करणाच्या कामाचा समावेश आहे. या कामामुळे शिनोली, शिंदेवाडी, पिंपळगांव घोडे, दरेकरवाडी, घोडेगांव, नारोडी, लांडेवाडी या गावांना या कामाचा फायदा होणार आहे. तसेच कालव्या शेजारील गळतीमुळे बाधीत झालेल्या जमीनींना संरक्षण मिळणार आहे. सध्या कालवा पूर्ण क्षमतेने वाहत नाही. अस्तरीकरण केल्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,
जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, प्रांताधिकारी सारंग कोडीलकर,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर उपस्थित होते.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकास आराखड्यातील कामाची पाहणी

श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर परिसरात गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी भेट दिली व श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील विकास आराखड्याची माहिती घेतली.

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातुन भिमा नदी पात्र,
मोक्षकुंड, भिमा उगम, निगडाळे ते भीमाशंकर रस्ता काॅंक्रीटीकरण आदी कामे सुरू आहेत. या कामाबाबत कार्यकारी अभियंता बी.एन.बहीर, प्रातांधिकारी सारंग कोडीलकर यांनी माहिती दिली.

भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाचा आराखडा समजून घेवून भाविकांना येण्याजाण्यास सोईस्कर होईल या पद्धतीने दर्शन रांग करण्याबाबत श्री.वळसे पाटील यांनी सुचना दिल्या. तसेच विकास आराखड्या संदर्भात विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा तसेच आगामी काळात होणाऱ्या कामांचा आढावा व निधी पुर्ततेबाबत लवकरच उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचेही श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, मधुकर गवांदे, रघुनाथ कोडीलकर, दत्तात्रय कौदरे, भिमाशंकरचे उपसरपंच दत्तात्रय हिले उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...