राज्यात गृहखात्यांचा व कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे,ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला प्रविण दरेकर

Date:

मुंबई दि. १८ मार्च – सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ठाकरे सरकारने पोलिस दलात बदलांचा बाजार मांडला आहे, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
पोलिस दलात होणाऱ्या बदली संदर्भात संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आज दस्तुरखुद्द आयपीएस अधिकारी संजय पांडे अगदी उद्विकतेने सांगतो माझ्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारची भूमिका आयपीएस अधीकारी पत्राद्वारे करत असेल यापेक्षा गंभीर काहीच असु शकत नाही, असे दरेकर यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त पदी हेमंत नगराळे यांची नि.क्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त पदचा पदभार स्विकारल्या नतंर हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलले की पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असुन पुनः गतवैभवाचे दिवस आणायचे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी करता कामा नये. या संदर्भात दरेकर म्हणाले की, राज्यसरकारला गृहखातं सांभाळण्यात अपयश आले आहे. पोलीस खात्यात कोणाचा कोणाला मेळ नाही, नियंत्रण नाही आणि त्यातून अशा प्रकारचे वाझे तयार होतात आणि उद्वीगतेने संजय पाटील यांची स्टेटमेंट येते. गृहखात्यांचा व कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.
राज्यात ठाकरे सरकार आल्यानतंर कॉरंटाईन सेंटर पासून हॉस्पिटल मध्ये बलात्कार, विनयभंगाचे प्रकार घडले. महिलांवर अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. खून, दरोडे होत आहे. वाझे सारखा खाकी वर्दी माणूस अनेक प्रकरणात समावेश आहे. या सरकर मध्ये कोणतेही नियत्रणा नसुन पोलिस दलाचे बदनामी झाली असुन याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार आहे असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...