तब्बल १०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि दूर्मिळ गाड्या पुण्यात….

Date:

विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कारचे विनामूल्य प्रदर्शन दुर्मिळ, युद्धपूर्व, युद्धोत्तर, क्लासिक आणि भारतीय क्लासिक्स गाड्यादि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्टस् च्या वतीने आयोजन ; सन १९२० ते १९९० मधील १०० पेक्षा अधिक गाड्या
पुणे : महायुद्धाच्या काळातील म्हणजे १९३९ सालातील रुबाबदार फोक्सवॅगन कार…१९२० सालातील ऐटीत उभी असलेली निळ्या रंगाची कॅनॅडियन ओव्हरलॅंड…४० वर्षांपूर्वीची मर्सिडीज….६० व्या दशकातील साईड कार…याशिवाय १९३५ सालापासूनच्या…हिंद मोपेड…हितोडी…सम्राट…कायनेटीक स्पार्क…हिरो मॅजेस्टीक या मोटार बाईक…१९५० सालातील एनएसयू क्विकली…अशा मेड ईन इंग्लड…जपान…चेकोस्लोव्हाकिया…फ्रान्स येथील १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या ऐतिहासिक काळातील भव्य गाड्यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

दि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्ट्स यांच्यावतीने बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यावरील केंजळे बिझनेस कॉपोर्रेट सेंटर येथे विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेऴी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश दवे, उपाध्यक्ष अरविंद पासलकर,  प्रमुख आयोजक विनीत केंजळे, दि असोसिएशन फॉर रेसिंग अ‍ँड मोटार स्पोर्ट्स, आग्राचे राममोहन कपूर, शितल राठोड, ललित जानी उपस्थित होते.

सन १९२० ते १९९० या काळातील १०० पेक्षा अधिक गाड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. नॉर्टन, वेलोसेट, ट्रायम्फ, बीएसए, एरियल, रॉयल, एनफिल्ड, जावा, येझदी, राजदूत, यामाहा, वेस्पा, लॅम्ब्रेटा या गाड्यांचा समावेश प्रदर्शनात आहे.

कमलेश दवे म्हणाले, आयुष्यात पहिल्यांदा जी गाडी खरेदी करतो, त्यावर प्रत्येकाचे प्रेम असते. ती गाडी सहसा आपण कधी विकत नाही. अशाच आपल्या गाड्यांवर अतोनात प्रेम करणाऱ्या मोटारप्रेमींच्या गाड्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १९२० सालापासून लोकांनी अतिशय प्रेमाने जपून ठेवलेल्या चांगल्या स्थितीतील गाड्या आहेत. प्रदर्शनातील सहभागी संग्राहकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

रुबेन सोलोमन, सॅम सोलोमन आणि विनीत केंजळे यांच्या गाड्यांचे प्रदर्शन या वेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नितीन सहस्त्रबुद्धे ,श्रीनिवास ठाकूर, शेखर सौदेकर, स्वीकार राठोड, राहुल मोकाशी, संदीप कटके आणि इतर पुण्यातील संग्रहकांच्या गाड्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

दुर्मिळ, विंटेज, युद्धपूर्व, युद्धोत्तर, क्लासिक आणि भारतीय क्लासिक्स या श्रेणीमध्ये गाड्यांचे विभाजन करण्यात आले आहे. निवडक आणि काही हौशी दिग्गजांनी ठेवलेल्या जुन्या काळातील या भव्य जुन्या गाड्या पाहण्याचे साक्षीदार होण्याची  संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. रविवार दिनांक ३ ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते ५ यावेळेत प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...