हे विधानसभा निवडणूक होताच का नाही केले ? केले असते तर मधली अडीच वर्षे अशी गेली नसती …
पुणे-देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अगदी ऐनवेळी घेतल्यासंदर्भात भाष्य करताना शरद पवारांनी, “फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
भाजप शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतरही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुय्यम पद स्विकारले हे त्यांचा चेहराच सांगत होता. कदाचित संघाचे त्यांच्यावर संस्कार असल्याने त्यांनी पद नाकारले नाही; पण ते नाखूश असल्याचे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.शिवसेनेतून फुटलेले नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ आज सायंकाळी घेतली. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी वार्तालाप केला, त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, तीन ते चार गोष्टी या शपथविधीला कारणीभूत आहेत. गुवाहाटीत शिवसेनेचे सदस्य गेले, त्यानंतर या गटाने राज्याच्या नैतृत्व बदलाची मागणी असावी तसेच या पदावर काम करण्याची फडणवीस यांची अपेक्षा उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठी होती. पण त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसावे लागले याची कल्पना एकनाथ शिंदेंनाही नसावी असे पवार यांनी सांगितले.
मलाही धक्का बसला
पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे काम केले पण आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा धक्का आहे, पण जे पद मिळाले ते घ्यावे असे उदाहरण फडणवीसांनी दाखवून दिले. पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी नकार देणे हे शक्य नाही आणि तेच खरे ठरले. माझ्या मंत्रिमंडळाच शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात मीही मंत्री होतो असेही ते म्हणाले.39 आमदार फुटणे ही साधी गोष्ट नाही. एकनाथ शिंदेंची आधीच तयारी झाली होती. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वच जबाबदारी दिली त्यामुळे ही वेळ आली असावी का हे मला माहीत नाही.
शिवसेना संपणार नाही
इडीचे नाव पाचवर्षांपूर्वी कुणाला फारसे माहित नव्हते, पण राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांचे लोक आहेत त्यांच्याविरोधात भाजपने केला. आयटी, ईडी, सीबीआयचा वापर चिंताजनक आहे असे सांगत त्यांनी जे भाजपसोबत गेले त्यांच्यामागे ईडी लागली होती ते गेले तरीही शिवसेना संपणार नाही असेही सांगीतले.
शिंदे सरकार टिकेल का?
पवार म्हणाले, उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून राहीले नाही, पण शिंदे मुख्यमंत्री होतील हे अनपेक्षित होते. या सरकारवर लोकांचा विश्वास असायला हवा कारण ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले ते आगामी काळात मविआ एकत्र लढाई लढणार की नाही यावर अजून चर्चा झाली नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.
धक्कातंत्र जाणीवपूर्वक असेल
पवार म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना ते झाले नाहीत आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदी पक्षाने त्यांना बसायचे सांगीतले. हे धक्कातंत्र असून कदाचित जाणीवपूर्वक ते दिल्लीतील नेतृत्वाने दिले असावे असे दिसते.
हिंदुत्व हा फक्त मुद्दा
पवार म्हणाले, हिंदुत्व जे सांगतात त्यांची तीन महिण्यापूर्वी प्रतिक्रिया वेगळी असावी. काहीतरी आपण केलेली कृती झाकण्यासाठी ते सांगत आहेत उद्या त्यांना लोकांना मतदारसंघात जायचे असेल म्हणून त्यांनी हा मुद्दा पुढे केला असावा असेही पवार म्हणाले.
गुवाहाटीला आम्हीही लोक पाठविले होते
पवार म्हणाले, गुवाहाटीत हाॅटेलभोवती कडेकोट पहारा होता. आमचे काही सहकारी तेथे बसून होते पण त्यांना बंडखोर आमदारांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे त्यांच्याची चर्चा करता आली नाही. सीमेवरुन सैन्य आणणे हे उद्योग योग्य नव्हते असेही पवार म्हणाले.
शिवसेना वाढणार
पवार म्हणाले, उद्धव ठाकरे लोकांमध्ये जातील आणि लोकांना मत द्यायची संधी मिळेल तेव्हा उलटे चित्र दिसेल असे पवार यांनी सांगीतले. शिंदे गटावर खर्च करणारी अदृष्ट शक्ती असेल. यात काही सहभागी लोक दिसतात असे ते म्हणाले.

